अनेकदा लोकांना खराब नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागते. भारतात बीएसएनएल, रिलायन्स जीओ, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना सेवा पुरवतात. ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करत असताना केवळ एकाची निवड करावी लागते. परंतु, बऱ्याचदा दूरसंचार कंपन्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानंतर यूजर्स स्वत:साठी स्वस्त आणि चांगल्या योजना शोधत आहेत.

बरेचदा असेही होते की, ग्राहकांना एखाद्या कंपनीची सेवा आवडत नाही. त्यामुळे ते दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतात. यापूर्वी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे. पण, आता मोबाईल नंबर बदलणे खूप सोपे झाले आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नसून काही सोप्प्या स्टेप्स तुमची मदत करतील. हे काम तुम्ही घरबसल्याही करू शकता. जाणून घ्या सोप्या पद्धती.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
theft who beaten up pedestrian and stole mobile phone is arrested
पादचाऱ्याला मारहाण करुन मोबाइल चोरणारा गजाआड
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Special campaign for caste certificate verification.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…

आणखी वाचा : आता फोनमध्ये सिम न टाकताच करता येईल कॉल; तुमचे Jio, Airtel आणि Vi सिम कार्ड ‘या’ सोप्या स्टेप्सने ई-सिम सारखे बनवा

सिम कार्ड असे करा पोर्ट

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवा.
  • संदेशात पोर्ट लिहून जागा द्या आणि नंतर तुमचा १०अंकी मोबाईल क्रमांक टाका. उदाहरणार्थ, जर
  • तुमचा मोबाईल नंबर ९८७६५४३२१० असेल, तर तुम्ही असा संदेश टाइप करू शकता – पोर्ट ९८७६५४३२१०
  • आता १९०० वर मेसेज पाठवा.
  • मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये एक कोड असेल.
  • या कोडसह, तुम्हाला ज्या कंपनीचे सिम पोर्ट करायचे आहे त्या कंपनीच्या जवळच्या स्टोअरमध्ये जा किंवा कोणत्याही मोबाइल किंवा टेलिकॉम शॉपमध्ये जा.
  • यानंतर दुकानदार तुमच्या मेसेजची पुष्टी करेल आणि ओळखपत्र घेतल्यानंतर तुम्हाला नवीन सिम कार्ड देईल.
  • नवीन सिम दिल्यानंतर, तुमचे नवीन सिम कार्ड केव्हा सक्रिय होईल हे दुकान मालक तुम्हाला सांगेल.

Story img Loader