आजकाल जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट करत आहेत आणि विविध अ‍ॅप्स वापरत आहेत. त्यामुळे आपल्या बहुतांश महत्त्वाच्या बाबी स्मार्टफोनमध्ये सेव्ह असतात. अशातच जर आपला फोन चोरीला गेला तर चोरांसाठी आपल्या स्मार्टफोनमधील डिजिटल पेमेंट्स आणि वॉलेट्सचा अ‍ॅक्सेस मिळवणे अवघड गोष्ट नाही. उदाहरणार्थ, ब्राझीलमधील सो पाउलो येथील चोरट्यांनी फोनच्या मालकांच्या बँक डिटेल्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि त्यांचे पैसे चोरण्यासाठी आयफोन हँडसेट चोरी केला. अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने आपणही सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी तुमचा फोन हरवल्यास, तुम्ही खालील पद्धतींनी तुमच्या फोनचा किंवा त्यातील डेटाचा गैरवापर होणे टाळू शकता.

तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा

फोन हरवल्यास फोन नंबरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. सिम कार्ड ब्लॉक करणे म्हणजे फोनवरील ओटीपीद्वारे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकणारे प्रत्येक अ‍ॅप ब्लॉक करणे. तुम्ही नवीन सिम कार्डवर तुमचा तोच जुना नंबर मिळवू शकता. यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, परंतु तुमची प्रायव्हसी आणि मोबाइल वॉलेट यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.

आता २ दिवसांनंतरही सर्वांसाठी मेसेज डिलीट करणे होणार शक्य; WhatsApp च्या नव्या फीचरमुळे युजर्स खुश

मोबाईल बँकिंग सेवा बंद करा

तुमचा फोन चोरीला गेल्यावर चोर तुमच्या बँकेच्या डिटेल्स सहज अ‍ॅक्सेस करू शकतात त्यामुळे अशा वेळी बँकिंग सेवा बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे सिम कार्ड आणि मोबाईल अ‍ॅप एकत्र वापरले जातात कारण नोंदणीकृत नंबरवर ओटीपी शिवाय कोणतेही हस्तांतरण होऊ शकत नाही. पण फोन हरवला किंवा चोरीला गेला की लगेच दोन्ही ब्लॉक केले पाहिजेत.

युपीआय पेमेंट डिअ‍ॅक्टिवेट करा

थोडा विलंब तुम्हाला महागात पडू शकतो. एकदा तुम्ही फोन चोराला ऑनलाइन बँकिंग सेवांपासून रोखले गेले की, चोर युपीआय पेमेंटसारख्या इतर सुविधांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शक्य तितक्या लवकर ते डिअ‍ॅक्टिवेट करा.

सर्व मोबाईल वॉलेट ब्लॉक करा

मोबाईल वॉलेटमुळे आयुष्य खूप सोपे झाले आहे. पण जर तुमचा फोन चुकीच्या हातात पडला तर गुगल पे आणि पेटीएम सारखे मोबाईल वॉलेट तुम्हाला महाग पडू शकतात. त्यामुळे संबंधित अ‍ॅपच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधा आणि तुम्ही नवीन डिव्हाइसवर वॉलेट रीसेट करेपर्यंत कोणालाही अ‍ॅक्सेस दिला जाणार नाही याची खात्री करा.

WhatsAppने ब्लॉक केलेले अकाउंट पुन्हा अनब्लॉक करता येणार; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

पोलिसात तक्रार नोंदवा

एकदा तुम्ही वरील सर्व स्टेप्सचे अनुसरण केल्यावर, तुमच्या चोरी झालेल्या डिव्हाइसची माहिती अधिकार्‍यांना देणे देखील आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये फोन चोरीची तक्रार नोंदवू शकता आणि त्यांच्याकडून एफआयआरची प्रत देखील घेऊ शकता. जर तुमच्या फोनचा गैरवापर झाला असेल किंवा तुमच्या फोनद्वारे तुमचे पैसे चोरीला गेले असतील तर ही प्रत तुमच्यासाठी पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल.

Story img Loader