आपण प्रत्येकजण हल्ली सोशल मीडियाचा वापर करतो. त्यामध्ये आपण Instagram,WhatsApp , facebook वापरतो. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधतो. आपले काय काय करतो किंवा आपले काही फोटोज , व्हिडीओज,पोस्ट शेअर करत असतो. मात्र सोशल मीडियावर आपले जे अकाउंट असते ते सुरक्षित असणे देखील आवश्यक आहे. मात्र कधी कधी आपले अकाउंट हॅक होऊ शकते. मात्र आपले अकाउंट हॅक झालेले काहीवेळा कळत नसते. जर का तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये कोणी अनधिकृतपणे प्रवेश केला तर त्याचा Acess कसा काढून टाकायचा ते जाणून घेणार आहोत.
जर का तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये कोणीतरी अनधिकृतपणे प्रवेश केला आहे किंवा ते हॅक करण्यात आले आहे. तर इंस्टाग्राममध्ये सध्या तुमच्या अकाउंटमध्ये कोणकोणत्या डिव्हाइसने लॉग इन केले आहे ते पाहता येते. इंस्टाग्राम अकाउंट कसे सुरक्षित करण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.
१. तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये कोणी कोणी लॉग इन केले आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनवर Instagram App ओपन करा.
२. त्यानंतर खाली असलेल्या सर्कलमधील आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या प्रोफाईलवर जावे.
३. प्रोफाईलवर गेल्यावर वरील बाजूच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
४. त्यानंतर Security आणि Privacy या पर्यायांवर क्लिक करा.
५. तिथे तुम्हाला Meta चे Accounts Center दिसेल. तिथे क्लिक केले असता नवीन स्क्रीन ओपन होईल.
६. Account Settings मध्ये जाऊन Password व security वर क्लिक करा.
७. त्यानंतर तिथे तुम्हाला तुम्ही कुठे लॉग इन केले आहे ते दिसेल.
८. त्यावर क्लिक केल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये संशयास्पदरित्या कोणी लॉग इन केले आहे ती अकाउंट्स दिसतील.
९. त्यानंतर तुम्हाला ज्या अकाउंट्सना डिलीट करायचे आहे त्यांना सिलेक्ट करून लॉगआऊट वर क्लिक करावे.