Har Ghar Tiranga: ७५वा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात तल्लीन झालेला दिसतो आहे. भारत सरकारकडून देखीक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला जात असून त्यासोबत हर घर तिरंगा मोहीमही जोमात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन प्रत्येक नागरिकाला केले आहे. त्याच वेळी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय नागरिक त्यांच्या डीपीवर म्हणजेच व्हॉट्सऍप प्रोफाइलवर तिरंग्याचा फोटो लावत आहेत. तुम्हालाही तिरंगा डीपी व्हॉट्सअॅप किंवा इंस्टाग्रामवर टाकायचा असेल तर आम्ही खूप सोपे मार्ग दिले आहेत. ज्याने तुम्ही इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सऍपवर डीपी सहजपणे अपलोड करू शकता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
इंस्टाग्रामवर प्रोफाईल पिक्चर कसा बदलावा
- Instagram वर, तळाशी उजवीकडे प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.
- प्रोफाईल उघडल्यानंतर, प्रोफाइल संपादित करा असे चिन्ह दिसेल, त्यावर टॅप करा.
- येथे Change Profile Photo चा पर्याय येईल, त्याला टॅप करा.
- नवीन प्रोफाइल फोन पर्याय निवडा आणि गॅलरीत तिरंगा फोटो जतन करा निवडा
- फोटोचा आकार समायोजित करा आणि ओके बटण दाबा. तिरंगा इन्स्टाग्राम डीपीवर सेट केला जाईल.
( हे ही वाचा: 4G सिमवर 5G सेवा उपलब्ध असेल का? की नवीन सिमची आवश्यकता असेल? जाणून घ्या सविस्तर)
WhatsApp वर Profile Picture कसे बदलावा
- WhatsApp च्या वरच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील, त्यावर टॅप करा.
- येथे पर्यायांची यादी उघडेल, सेटिंग्जचे पर्याय निवडा.
- आता WhatsApp Profile Picture दिसेल, त्याला टॅप केल्यानंतर DP वर कॅमेरा आयकॉन दिसेल.
- हा कॅमेरा आयकॉन दाबल्यावर Camera and Gallery चा पर्याय येईल, Gallery चा पर्याय निवडा.
- येथे गॅलरीत जतन केलेला तिरंग्याचा फोटो निवडून पूर्ण करा. तिरंगा व्हॉट्सअॅप डीपीवर सेट केला जाईल.
- टीप: इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर तुमच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंगा ध्वज लावण्यासाठी, आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा तिरंगा फोटो डाउनलोड करून सेव्ह करावा लागेल.
First published on: 13-08-2022 at 12:13 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to put tricolor profile picture on instagram and whatsapp gps