मेसेज, कॉल, व्हिडीओ कॉल, ऑडीओ नोट अशा अनेक सुविधा व्हॉटसअॅपवर उपलब्ध आहेत. व्हॉटसअॅप वापरत नाही अशी तुमच्या संपर्कातील क्वचितच एखादी व्यक्ती असेल. त्यामुळे सर्वजण व्हॉटसअॅपवरुन संवाद साधण्याला प्राधान्य देतात. व्हॉटसअॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवे फीचर लाँच केले जातात. व्हॉटसअॅपच्या या सुविधांबाबतच्या टिप्सही तुम्ही वाचल्या असतील. त्यातीलच एक म्हणजे व्हॉटसअॅपवरील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करता येणे. व्हॉटसअॅपवरील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.
अँड्रॉइड आणि आयफोन फोनमध्ये व्हॉटसअॅपवरील व्हिडीओ कॉल कसे रेकॉर्ड करायचे जाणून घ्या
आणखी वाचा : एटीएमकार्डशिवाय वापरता येणार PhonePe UPI; आधारकार्डचा हा उपयोग तुम्हाला माहित आहे का?
अँड्रॉइड फोनसाठी या स्टेप्स वापरा
- X Recorder अॅप वापरुन तुम्ही व्हॉटसअॅपवरील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
- हे अॅप डाउनलोड करा आणि आवश्यक ती परवानगी द्या.
- त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल याच्या मदतीने तुम्ही व्हॉटसअॅपवरील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
आयफोनवर असे करा व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्ड
- आयफोनवर व्हॉटसअॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणे अधिक सोपे आहे, यासाठी व्हिडीओ कॉल सुरू करा.
- त्यानंतर तळाला असणाऱ्या स्वाइप बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर सेटिंग्ज पर्यायामधील ‘कंट्रोल सेंटर’ पर्याय निवडा.
- तिथे तुम्हाला स्किन रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून तुमचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करा.