Whatsapp Call Recording Steps: व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मपेक्षा व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्क साधणे अगदी सोपे होते, तसेच कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो – व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक अधिकच्या सुविधा या मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळेच संवाद साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपला अनेकजण प्राधान्य देतात. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. तर उपलब्ध असणाऱ्या या सुविधांमध्ये काही फीचर्सची युजर्सना गरज भासते, त्यातीलच एक फीचर म्हणजे व्हॉटसअ‍ॅपवरील कॉल रेकॉर्ड करता येणे. अँड्रॉइड फोन किंवा आयफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅपवरील कॉल कसा रेकॉर्ड कसा करायचा जाणून घ्या.

अँड्रॉइड फोनमध्ये कॉल रेकॉर्ड करण्यासाठी या स्टेप्स वापरा

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
bomb in 11 planes
अकरा विमानात बॉम्ब ठेवल्याच्या ट्विटमुळे एकच खळबळ
How to Update New mobile Number in Ration Card
नवीन मोबाइल नंबर घेतलाय, मग तो रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करायचा? जाणून घ्या
kaho na pyaar hai hritik roshan movie sets guinness world record
हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…
avni taywade tuzech mi geet gaat aahe fame child actress entry in new serial
‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम स्वराची स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत एन्ट्री! समोर आला पहिला फोटो…
WhatsApp Chat Memory feature
WhatsApp Chat Memory Feature : लवकरच व्हॉट्सॲप होणार तुमचा पर्सनल असिस्टंट, तुमच्या आवडीनिवडी ठेवणार लक्षात, पाहा कसं वापरायचं नवं फीचर
How To Add Song To Spotify From Instagram
Add Song To Spotify From Instagram : इन्स्टाग्राम रील्सवर प्रचंड व्हायरल होणारं गाणं सापडतंच नाही? मग ‘ही’ सोपी ट्रिक करेल तुम्हाला मदत
  • प्लेस्टोअरवरून ‘क्यूब कॉल अ‍ॅप’ (Cube Call App) डाउनलोड करा.
  • हे अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर व्हॉटसअ‍ॅप उघडा.
  • व्हॉटसअ‍ॅप कॉल चालू असताना तुम्हाला ‘क्यूब कॉल’चा पर्याय दिसेल.
  • हा पर्याय दिसत नसेल तर ‘क्यूब कॉल’ अ‍ॅपमध्ये जाऊन, ‘फोर्स VoIP’ या पर्यायावर क्लिक करा.
  • या प्रक्रियेनंतर व्हॉटसअ‍ॅप कॉल आपोआप रेकॉर्ड होईल. हे रेकॉर्डिंग्स इंटरनल मेमरीमध्ये सेव्ह होतील.

आणखी वाचा : तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्डची नोंद आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून लगेच जाणून घ्या

आयफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी या स्टेप्स वापरा
आयफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करणे कठीण आहे, कारण कोणतेही अ‍ॅप याला सपोर्ट करत नाही. आयफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी मॅक कंम्प्यूटरची गरज भासते. पुढील स्टेप्स वापरून मॅक कम्प्युटरद्वारे व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करा.

  • क्वीक टाइम अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आयफोन मॅक्स कम्प्युटरला कनेक्ट करून क्विक टाईम अ‍ॅप उघडा.
  • अ‍ॅपमधील फाईल पर्याय निवडा आणि त्यातील ‘न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग’ पर्याय निवडा.
  • त्यानंतर आयफोन पर्याय निवडून अ‍ॅपमधील रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर व्हॉटसअ‍ॅप कॉल करून, अ‍ॅड यूजर आयकॉनवर क्लिक करा. यामध्ये हा कॉल आपोआप रेकॉर्ड होईल.
  • कॉलचे रेकॉर्डिंग मॅकवर उपलब्ध होईल.