आजच्या काळामध्ये प्रत्येक जण मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी व्हाट्सअॅपचा वापर करतो. हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून ते मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. मात्र एखादेवेळेस तुम्ही तुमचे डिव्हाईस रिसेट केले किंवा बदलले तर चुकून व्हाट्सअॅपचे महत्वाचे मेसेज डिलीट झाले तर ? तुमच्याकडे ते डिलीट झालेले पुन्हा मिळवण्याचा काही पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण डिलीट झालेले व्हाट्सअॅप चॅट्स कसे रिकव्हर करायचे हे जाणून घेऊयात.
तुम्हीजर का android वापरकर्ते असाल तर WhatsApp तुम्हाला दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक याप्रमाणे google ड्राइव्ह किंवा डिव्हाईसमध्ये chat चा बॅकअप घेण्याची परवानगी देते. याच्या मदतीने तुम्ही तुमचे मेसेजेस रिकव्हर करू शकता. तसेच त्यामध्ये तुम्ही ऑटो बॅकअप हा पर्याय देखील सुरु करू शकता.
गुगल ड्राइव्ह वरून डिलीट झालेले WhatsApp चॅट रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला तोच मोबाईल नंबर आणि गुगल अकाउंट वापरण्याची आवश्यकता आहे जो बॅकअप तयार करण्यासाठी तुम्ही वापरला होता. पहिल्यांदा तुम्ही Android डिव्हाइसवरून WhatsApp अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. त्यानंतर WhatsApp ओपन करा व साइन इन करण्यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल नंबर टाका. नंतर त्या नंबरवर आलेला ओटीपी नंबर टाईप करा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला Google Drive वरून तुमचा चॅट बॅकअप रिकव्हर करता येईल.