स्टोअरेज स्पेससाठी व्हॉट्सअॅपमधील मीडिया फाइल्स डिलीट करत असताना महत्वाचे फोटोज, व्हिडिओज डिलीट झाले असतील, तर चिंता करू नका. या फाईल्स तुम्हाला परत मिळू शकतात. त्या परत कशा मिळू शकतात, याबाबत आपण जाणून घेऊया.
डिलीट झालेले मीडिया फाईल्स परत मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून कोणतेही फीचर देण्यात आलेले नाही. मात्र, काही ट्रिक्सद्वारे तुम्ही फोटो आणि व्हिडिओ परत मिळवू शकता.
(ड्युअल कॅमरा सेटअपसोबत मिळू शकतो OPPO FIND N2 FLIP, व्हिडिओमध्ये पाहा भन्नाट लूक)
१) फाईल्स गॅलरीमधून मिळू शकतात
व्हॉट्सअॅप बाय डिफॉल्ट फोन गॅलरीत सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करतो. तुम्ही मीडिया पाठवला असला आणि तो चॅटमधून डिलीट केला असला तरी फोटोज फोनची गॅलरी, गुगल फोटोज किंवा फोटोज फॉर आयओएसमध्ये सेव्ह होतात.
२) बॅकअप मिळवणे
व्हॉट्सअॅप चॅट आणि मीडिया अँड्रॉइड युजर्ससाठी गुगल ड्राइव्हमध्ये आणि आयओएस युजरसाठी आयक्लाऊडमध्ये सेव्ह करतो. दैनंदिन बॅकअप घेतल्यानंतर मीडिया डिलीट झाला असेल तर तुम्ही गुगल ड्राइव्ह आणि आयक्लाऊडवरून बॅकअप रिस्टोअर करून तुम्ही मीडिया फाईल्स परत मिळवू शकता. यासाठी पुढील स्टेप्स करा.
- फोनमधील व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा रिइन्स्टॉल करा.
- पूर्वीच्या फोननंबरसह सेटअप पूर्ण करा.
- सेटअप दरम्यान बॅकअपवरून डेटा रिस्टोअर करण्याबाबत विचारले असता ते मान्य करा.
- सेटअप पूर्ण झाल्यावर संपूर्ण मीडिया आणि चॅट फोनमध्ये रिस्टोअर होईल.
(TWITTER: इलॉन मस्कच्या पुणेकर मित्राचे खाते निलंबित, ‘हे’ आहे कारण)
३) व्हॉट्सअॅप मीडिया फोल्डर तपासा
- फाइल एक्सप्लोरर अॅप ओपन करा.
- रूट डायरेक्ट्रीमधील व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये जा.
- आता मीडिया फोल्डर अंतर्गत व्हॉट्सअॅप इमेजेस फोल्डरमध्ये जा. यात तुम्हाला मिळालेली छायाचित्रे दिसून येतील. सेंट फोल्डरमध्ये तुम्हाला डिलीट केलेले फोटो किंवा मीडिया दिसून येईल.