व्हॉटसअ‍ॅपवर सतत टेक्स्ट, मीडिया किंवा इतर फाइल्स शेअर केल्या जातात. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज लगेच भरू शकते. त्यामुळे नव्या मीडिया फाइल्स किंवा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करणे किंवा डाऊनलोड करणे कठीण होते. अशावेळी व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कमी करता येईल का याचा पर्याय शोधला जातो, पण याबद्दल बऱ्याच जणांना कल्पना नसते. आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज कमी करण्यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या जाणून घ्या.

आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज कमी करण्यासाठी आधी किती स्टोरेज उपलब्ध आहे हे तपासणे आवश्यक आहे हे तपासणे गरजेचे आहे. ते कसे तपासायचे जाणून घ्या.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…

असे तपासा आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज
आयफोनमध्ये सेटींग्स पर्याय उघडा. त्यामध्ये जनरल पर्याय निवडा. त्यानंतर आयफोन स्टोरेज पर्यायामध्ये व्हॉटसअ‍ॅप पर्याय निवडा, अशाप्रकारे आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज तपासता येईल.

आणखी वाचा: घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी; कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज कमी करण्यासाठी या स्टेप्स निवडा

  • व्हॉटसअ‍ॅपमध्ये सेटींग्स पर्याय निवडा.
  • त्यानंतर ‘स्टोरेज अँड डेटा’ पर्याय निवडा.
  • त्यामध्ये मॅनेज स्टोरेज पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये तुम्हाला पुर्ण व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज दिसेल. त्यातील अनावश्यक मीडिया डिलीट करा.
  • ५ एमबी पेक्षा मोठ्या फाईल्स निवडा आणि त्या डिलीट करा.
  • याप्रमाणेच ‘फॉरवर्डेड मेनी टाइम्स’ अशा मीडिया फाइल्स देखील तुम्ही डिलीट करू शकता, याचा पर्यायही मॅनेज स्टोरेजमध्ये उपलब्ध असतो.

अशाप्रकारे तुम्ही आयफोनवर व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज कमी करू शकता. तसेच ऑटो डाउनलोडमुळे जर मीडिया फाइल्स डाउनलोड होऊन स्टोरेज फुल होत असेल तर, ऑटो डाऊनलोड सेटींग्स बदलू शकता. हा पर्याय ‘स्टोरेज अँड डेटा मेन्यु’मध्ये उपलब्ध असतो. हा पर्याय निवडुन ‘मीडिया ऑटो डाउनलोड’ पर्याय निवडुन, त्यात ‘नेवर’ पर्यायावर क्लिक करा. यामुळे मीडिया ऑटो डाउनलोड होणार नाहीत.

Story img Loader