अनेकांना आपण महत्त्वाची कागदपत्रं, ओळखपत्र ही पीडीएफ स्वरूपात पाठवत असतो. पीडीएफ फाईल्समध्ये अनेकांची आवश्यक कागदपत्रं ठेवलेली असतात. त्यामुळे या फाईल्सला कोणीही उघडू नये यासाठी पासवर्डने लॉक केले जाते. मात्र, वारंवार फाईल ओपन करताना पासवर्ड टाकावा लागणे ही देखील एक मोठी समस्या असल्याने अनेकांना पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढून टाकायचा असतो. तसेच जर तुम्हाला कुणासोबत ही फाईल शेयर केली की त्याला पासवर्डही द्यावा लागतो. पण पासवर्ड विसरल्यास समोरच्या युजर्सना ती फाईल उघडता येत नाही. यासाठी अगदी सहज-सोप्या पद्धतीने तुम्ही पीडीएफ फाईलचा पासवर्ड हटवू शकता. यासाठी काही स्टेप्स तुमच्या कामी येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी,  वापरकर्ते इंटरनेट टूल्स वापरु शकतात किंवा कोणत्याही वेबसाइटवरून ते सहजपणे काढू शकतात. हे काम फक्त १ मिनिटात पूर्ण होते.

(आणखी वाचा : एटीएममधून पैसे काढताय…सावधान! ‘ह्या’ चुका केल्यास तुमचे खाते होईल रिकामे)

  • पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी, क्रोम ब्राउझरमध्ये पीडीएफ पासवर्ड रिमूव्हर शोधल्यानंतर, काही वेबसाइट दिसतील, ज्यावर क्लिक केल्यानंतर ती प्रोसेस फॉलो करुन पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढला जाऊ शकतो. https://www.ilovepdf.com/ यावरुनही तुम्ही पीडीएफ फाईल अनलॉक करु शकता.
  • पीडीएफ फाईलमधून पासवर्ड काढण्यासाठी, यूजर्स मोबाइल देखील वापरू शकतात. त्यात क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर, पीडीएफ फाइल रिमूव्हर शोधून त्यात दिलेली पासवर्ड काढण्याची प्रक्रिया फॉलो करुन पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढला जाऊ शकतो.

 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove password from pdf file pdb