जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ असतील आणि चुकून डिलीट झाले असतील. तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. गुगल ड्राइव्हवर ठेवलेले फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज सहजपणे मिळतात. पण जर हे फोटो आणि व्हिडीओ ड्राईव्हवर सेव्ह केले नसतील तर तुम्ही काही अ‍ॅप्सच्या मदतीने ते रिस्टोअर करू शकता. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही फोनमधून डिलीट झालेले फोटो, व्हिडीओ किंवा ऑडीओ फाइल्स रिकव्हर करू शकता. चला जाणून घेऊया या अ‍ॅप्सची संपूर्ण माहिती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोनवरून फोटो किंवा फाइल डिलीट केल्यावरही फोनमधील इमेज फाइलमध्ये उपलब्ध असते आणि निश्चित स्टोरेजमध्ये उपलब्ध असते. म्हणजेच, नवीन फोटो जुन्याची जागा घेते. अशा परिस्थितीत फोनमधून डेटा कायमचा निघून जातो. फोन फॅक्टरी रिस्टोअर किंवा फॉरमॅट केलेला असल्यास डेटा कायमचा नष्ट होतो. या अ‍ॅप्सची खास गोष्ट म्हणजे ते फोनमधून डिलीट झालेल्या फाइल्स फोनच्या टेम्पररी मेमरीमधून रिस्टोअर करतात. यासाठी तुमचा फोन स्कॅन केला जातो. यानंतर तुमची फाईल स्कॅन करून तुमच्या समोर दाखवली जाते. तुमच्या फोनमध्ये रिसायकल बिन आणि रीसेट फोल्डर असल्यास हे अ‍ॅप ते रिस्टोअर करणार नाही.

Jio Prepaid Plan: २०२२ या वर्षासाठी जिओचे बेस्ट प्लान, जाणून घ्या

अ‍ॅप्स आणि साइज पाहुयात

  • DiskDigger photo recovery 4.7MB
  • File Recovery – Restore Files 7.3MB
  • Photo & Video & Audio Recover 5.4MB
  • Deleted File Recovery 4.5MB
  • File Recovery – Recover Deleted Files 4.0MB
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to restore delete photo and video on mobile know rmt