Reuse old smartphone : फोन जुना झाला की लोक आपल्या बजेटनुसार नवीन फोन खरेदी करतात आणि जुना फोन एकतर विकतात अन्यथा तो घरात तसाच पडून असतो. पण, तुम्हाला माहितीये का? या जुन्या फोनला तुम्ही दुसऱ्या महत्वाच्या कामी लावू शकता. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा पुन्हा वापर करू शकता. ते कसे करायचे जाणून घेऊया.
१) कारमध्ये टचस्क्रीन म्हणून वापरू शकता
कारमध्ये टच पॅनल नसल्यास त्याजागी तुम्ही फोनचा वापर करू शकता. ऑटोमॅट अॅप डाऊनलोड करून तुम्हाला टच पॅनल म्हणून फोनचा वापर करता येऊ शकते. याचा वापर तुम्ही गुगल मॅप्स पाहण्यासाठी देखील करू शकता. तसेच, गाणी ऐकण्यासाठी देखील करू शकता.
(नाविन्यपूर्ण डिजाईनमुळे लोकप्रिय झाले ‘हे’ 5 Smartphone, व्हिडिओ पाहून बनवणाऱ्याचे कराल कौतुक)
२) डॅश कॅमेरा म्हणून वापरू शकता
तुमच्या जुन्या फोनमध्ये कॅमेरा व्यवस्थित काम करत असल्यास तुम्ही त्याचा उपयोग डॅश कॅमेरा म्हणून करू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून डॅश कमेरा अॅप डाऊनलोड करावे लागेल.
३) सीसीटीव्ही बनवू शकता
जुना फोन तुम्ही सीसीटीव्ही म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये थोडे बदल करावे लागतील. यासाठी तुम्हाला आयपी वेबकॅम अॅप इन्सटॉल करावे लागेल जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.