इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या कमालीचे लोकप्रिय होत आहे. यातील स्टोरी या ऑप्शनचा युजर्सकडून मोठ्याप्रमाणात वापर होतोय. युजर्स आपल्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांसोबतचे चांगले, वाईट क्षण इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत असतात. या स्टोरीमध्ये युजर्सला म्युझिक, स्टिकर्ससह काही क्रिएटिव्ह करण्याचे अनेक ऑप्शन्स आहेत. पण ही स्टोरी युजर्सला केवळ २४ तासच दिसते. त्यानंतर त्या गायब होतात. अनेकदा एखादी स्टोरी आपल्याला आवडते आणि ती म्युझिकसह डाऊनलोड करण्याची इच्छा असते. पण म्युझिकसह स्टोरी डाऊनलोड कशी करायची हे माहित नसल्याने ती डाऊनलोड करण्यात अडचणी येतात. पण आता तुम्ही ३ सोप्या ट्रिकने इन्स्टाग्राम स्टोरी म्युझिकसह डाऊनलोड करु शकता. या ट्रिक नेमक्या काय आहेत जाणून घेऊ…
#Hack 1 : आर्काइवमध्ये म्युझिकसोबत स्टोरी सेव्ह करायचीय?
इन्स्टाग्रामवर आर्काइवमधून (ARCHIVE) एखादी स्टोरी तुम्हाला म्युझिकसोबत अगदी सोप्या पद्धतीने सेव्ह करता येते. २४ तासानंतर जरी ती स्टोरी गेली तरी ती पुन्हा पाहता येते. आर्काइवमध्ये इन्स्टाग्राम स्टोरी सेव्ह करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स…
१) सर्वप्रथम इन्स्टाग्राम प्रोफाईल ओपन करा, आता अॅड चिन्हावर टॅप करा.
२) आता स्टोरीवर जा आणि शटर बटणाचा वापर करून एखादी स्टोरी रेकॉर्ड करा किंवा तुमच्या डिव्हाइसच्या गॅलरीमधून स्टोरीसाठी फोटो, व्हिडीओ सिलेक्ट करा.
३) आता स्टिकर आयकॉनवर टॅप करा आणि मेनूमधून म्युझिक निवडा.
४) तुम्ही इन्स्टाग्राम म्युझिक लायब्ररीमधूनही गाणं सर्च करा. यात तुम्हाला आवडेलं गाणं निवडा आणि त्या गाण्यावर टॅप करा.
५) स्लाइडरचा वापर करून तुम्ही म्युझिक ड्युरेशन सेलेक्ट करा आणि डन बटणावर टॅप करा. आता स्टोरी पोस्ट करण्यासाठी ऑन-स्क्रीन दिलेल्या सुचना फॉलो करा. (तुम्ही स्टोरीमध्ये स्टिकर्स आणि इतर एलिमेंट देखील जोडू शकता.)
६) स्टोरी पोस्ट केल्यानंतर ती पुन्हा ओपन करण्यासाठी तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर More वर टॅप करा.
७) आता स्टोरी सेटिंग्जवर टॅप करा.
८) खाली स्क्रोल करा आणि स्टोरी आर्काइवमध्ये सेव्ह करण्यासाठी टॉगल ऑन करा.
आता प्रत्येकवेळी जेव्हा कधी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट कराल, तर ती इन्स्टाग्राम आर्काइवमध्येही आपोआप सेव्ह होईल. पण ही इन्स्टाग्राम स्टोरी मोबाईलमधील लोकल डिव्हाइज स्टोरेजवर सेव्ह करता येत नाही. तसेच ती पाहण्यासाठी तुम्हाला अॅटिव्ह इंटरनेट कनेक्शनची गरज लागे
#Hack 2 : रेकॉर्डर वापरूनही तुम्ही करा म्युझिक स्टोरी सेव्ह
तुम्हाला लोकल डिव्हाइसमध्ये इन्स्टाग्राम स्टोरी सेव्ह करायची असल्यास तुम्ही स्क्रीन रेकॉर्डर अॅपचाही वापर करु शकतात. यामुळे केवळ तुमचीच नाही तर कोणत्याही युजर्सची इन्स्टाग्राम स्टोरी तुम्ही ऑडिओसह सेव्ह करू शकता.
१) सर्वप्रथम मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या स्क्रीन रेकॉर्डर चिन्हावर टॅप करा. आता अॅप ड्रॉवरमधून स्क्रीन रेकॉर्डर अॅप ओपन करा.
२) त्यानंतर Media and Mic ऑप्शन निवडा. तुमच्या डिव्हाइसचा व्हॉल्यूम मोठा करत स्टार्ट रेकॉर्डिंगवर टॅप करा.
३) आता रेकॉर्डिंग काउंटडाउन सुरू झाल्यावर तुम्हाला जी इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायची आहेत ती ओपन करा.
४) त्यानंतर रेकॉर्डिंग पूर्ण करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी स्टॉप बटणावर टॅप करा.
अशाप्रकारे डाऊनलोड केलेली इन्स्टाग्राम स्टोरी तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या गॅलरीत सेव्ह केली जाईल.
#Hack 3 : शेअर बटण वापरा आणि ….
शेअर बटण वापरून करत तुम्ही तुमची इन्स्टाग्राम स्टोरी म्युझिकसह सेव्ह करू शकता. यासाठी प्रथम तुम्ही बनवलेली स्टोरी म्युझिकशिवाय डिव्हाइजवर सेव्ह करा. त्यानंतर कोणताही चॅट बॉक्स ओपन करा आणि आधी सेव्ह केलेल्या स्टोरीमध्ये म्युझिक जोडा. आता स्टोरी चॅटमध्ये शेअर केल्यावर ती जास्त वेळ प्रेस करून ठेवा आणि तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह करा. ही प्रोसेस समजायला कठीण आहे पण आम्ही तुम्हाला सोप्पी करून सांगत आहोत.
१) इन्स्टाग्राम अॅप ओपन करा आणि अॅड आयकनवर टॅप करा.
२) आता स्टोरी टाकण्यासाठी तुम्हाला पाहिजे तो फोटो किंवा व्हिडीओ निवडा.
३) आता स्टिकर आयकनवर टॅप करा आणि म्युझिक निवडा.
४) तुम्हाला आवडेल ते म्युझिक निवडा आणि डन बटणावर क्लिक करा.
५) स्टोरी पोस्ट करण्यापूर्वी वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉटवर टॅप करा आणि नंतर सेव्हवर टॅप करा.
६) आता स्टोरी ऑडिओशिवाय सेव्ह झाली असेल, पण पुढे ऑडिओसोबत व्हिडीओ पाहिजे असेल तर पुढची प्रोसेस करा.
७ ) आता तुमच्या चॅटबॉक्समधील कोणत्यागी नावावर क्लिक करा.
८) आता त्या युजर्सच्या चॅटबॉक्समध्ये कॅमेरा चिन्हावर क्लिक करा.
९) आता खाली उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या गॅलरी चिन्हावर टॅप करा. आता तुम्ही गॅलरीमध्ये पूर्वी सेव्ह केलेली स्टोरी निवडा.
१०) आता पुन्हा स्टोरी ओपन केल्यानंतर स्टिकर चिन्हावर टॅप करा आणि नंतर पुन्हा म्युझिकवर टॅप करा.
११) आता स्टोरीमध्ये आधी सेव्ह केलेल्या स्टोरीचा ऑडिओ किंवा म्युझिक जोडा.
१२) ऑडिओ पुन्हा जोडल्यानंतर डन बटनावर टॅप करा. तुम्ही या स्टोरीमध्ये अॅनिमेशन आणि इतर अॅलिमेंट जोडू शकता.
१३) या स्टोरीच्या डाव्या कोपऱ्यात तोपर्यंत टॅप करत रहा जोपर्यंत तुम्हाला कीप इन चॅट ऑप्शन दिसत नाही.
१४) त्यानंतर सेंड ऑप्शनवर टॅप करा.
१५) आता तुमची स्टोरी पुन्हा एका चॅटमध्ये दिसले, ज्यावर काहीवेळ प्रेस करून ठेवा आणि नंतर सेव्ह वर टॅप करा.
अशापद्धतीने तुम्ही इन्स्टाग्राम स्टोरी तुमच्या डिव्हाइसच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता.