व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपल्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्ये बहुतांश सर्वचजण व्हॉटसअ‍ॅप वापरतात. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्क साधणे अगदी सोपे होते, तसेच कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो – व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक अधिकच्या सुविधा या मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्क साधण्याला प्राधान्य दिले जाते. व्हॉटसअ‍ॅपवर बऱ्याचदा आपण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स किंवा माहिती शेअर करतो. ही माहिती तसेच मीडिया फाईल्स कायम स्वरूपी मोबाईलमध्ये सेव्ह करण्यासाठी बॅकअपबरोबर आणखी एक पर्याय उपलब्ध आहे, कोणता आहे तो पर्याय जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फोनमधून व्हॉटसअ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यानंतरही चॅट्स फोनमध्ये सेव्ह राहावेत यासाठी चॅट्स एक्सपोर्ट हा पर्याय उपलब्ध आहे, हा पर्याय कसा वापरायचा जाणून घ्या.

आणखी वाचा : तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्डची नोंद आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून लगेच जाणून घ्या

चॅट्सचा बॅकअप घेण्याचा पर्याय
व्हॉटसअ‍ॅप > मोर पर्याय > सेटिंग्स > चॅट > चॅट बॅकअप हे पर्याय वापरून तुम्ही चॅट्सचे बॅकअप मिळवू शकता.

चॅट्स एक्स्पोर्ट करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • व्हॉटसअ‍ॅपवर पर्सनल चॅट किंवा ग्रुप चॅट उघडा.
  • ‘मोर’ पर्याय निवडुन त्यातही असणारा ‘मोर’ पर्याय निवडा, त्यामध्ये चॅट एक्स्पोर्ट पर्याय दिसेल तो निवडा.
  • तिथे तुम्हाला चॅट मीडिया फाइल्सबरोबर एक्स्पोर्ट करायचे आहेत की मीडिया फाइल्सशिवाय एक्स्पोर्ट करायचे आहेत ते निवडण्याचा पर्याय दिसेल, त्यामधील तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
  • तुमच्या चॅट्सचे एक टेक्स्ट डॉक्युमेंट तयार केले जाईल, तुम्हाला ते कुठे शेअर करायचे आहे, याचा पर्याय दिला जाईल.
  • अशाप्रकारे तुम्हाला हवे ते चॅट्स तुम्ही टेक्स्ट डॉक्युमेंट स्वरूपात फोनमध्ये सेव्ह करू शकता. व्हॉटसअ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यानंतरही हे डॉक्युमेंट फोनमध्ये सेव्ह राहील.