मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. अनेक लहान-मोठ्या कामांसाठी मोबाईल फोनचा वापर केला जातो. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. सध्या स्मार्ट फोनमध्ये बॅटरी इनबिल्ड असते. त्यामुळे बॅटरी उतरल्यानंतर ती बॅटरी काढून तिच्या जागी दुसरी बॅटरी मोबाईलमध्ये बसवता येत नाही. मोबाईल फोनची बॅटरी लवकर उतरू नये तसेच ती दिर्घकाळ टीकावी यासाठी तुम्ही काही सोप्या पध्दतींचा अवलंब करु शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवा

मोबाईल फोनचा ब्राईटनेस जास्त ठेवल्याने फोनची बॅटरी लवकर उतरते. त्यामुळे फोनचा ब्राईटनेस जास्त ठेवू नका. ब्राईटनेस कायम लो ठेवा. तुमच्या फोनचा डिस्प्ले AMOLED किंवा OLED असेल तर डार्क मोड ऑन करा. कारण AMOLED किंवा OLED डिस्प्ले असणारे फोन डार्क मोड ऑन केल्यानंतर कमी बॅटरी कन्झ्यूम करतात.

हेही वाचा : RBI चा युजर्ससाठी मोठा निर्णय! UPI Lite च्या मदतीने पिन शिवाय करता येणार ‘इतक्या’ रूपयांचा व्यवहार

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स आणि फिचर्स मॅनेज करावेत

फोनमध्ये अनेकदा वापरात नसलेले अ‍ॅप्स असतात. अशा एपमुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. त्यामुळे फोनच्या सेटींग्समध्ये जाऊन ‘बॅटरी युसेज’ वर क्लिक करा. तिथे तुम्हाला कोणते अ‍ॅप किती बॅटरी वापरते ते दिसेल. जास्त बॅटरी वापरणारे व गरजेचे नसणारे अ‍ॅप तुम्ही अनइन्स्टॉल करु शकता. तसंच फोनमधील ब्लुटूथ, एनएफसी, जीपीएस आणि लोकेशन सेवा तूम्ही बंद करु शकता. असे केल्यास तुमच्या मोबाईलची बॅटरी टिकू शकते. याबाबतचे वृत्त digit ने दिले आहे.

बॅटरी सेव्हरचा वापर करा

‘बॅटरी सेव्हर’ किंवा ‘बॅटरी ऑप्टिमायझर’ मोड ऑन केल्यास फोनची बॅटरी टिकवता येते. फोनमध्ये सुरु असलेले सगळे ऑपरेशन्स थांबवण्याचे काम ‘बॅटरी सेव्हर’ किंवा ‘बॅटरी ऑप्टिमायझर’ करते.

व्हायब्रेशन मोड आणि हॅप्टिक फिडबॅक बंद ठेवा

तुमचा मोबाईल फोन जर व्हायब्रेट मोडवर असेल तर तो जास्त बॅटरी वापरतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते. बॅटरी जास्त वेळ टिकवायची असेल तर मोबाईलला व्हायब्रेट मोडवर ठेवणे टाळा. तसंच हॅप्टिक फिडबॅकही बंद ठेवा.

हेही वाचा : WhatsApp ने आणले नवीन फिचर; आता वापरकर्त्यांना…, जाणून घ्या सविस्तर

मोबाईलमधील अ‍ॅप्स आणि सोफ्टवेअरला अपडेट ठेवा

तुमच्या मोबाईलमधील अ‍ॅप्स आणि सोफ्टवेअरला अप टू डेट ठेवा. अ‍ॅप व सॉफ्टवेअर डेव्हलपरकडून वेळोवेळी अपडेट्स रिलीज केले जातात. अ‍ॅप व सॉफ्टवेअर अपडेट करुन घेतल्याने फोनचा परफॉर्मन्स सुधारतो. तसंच अ‍ॅप व सॉफ्टवेअरमध्ये असणारे बग्स फिक्स केले जातात. त्यामुळे फोनच्या बॅटरीची लाइफ वाढते.

फोनला नॉर्मल वातावरणात ठेवावे

अति गरम किंवा अति थंड वातावरणाचा मोबाईलच्या बॅटरीवर विपरित परिणाम होतो. बॅटरीची लाइफ कमी होते. त्यामुळे तुमचा मोबाईल फोन कायम नॉर्मल वातावरणात ठेवा. असे केल्यास बॅटरी जास्त वेळ टिकेल तसेच तिची लाइफही वाढण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to save your mobile battery adjust display configurations optimise battery setting ssome easy steps tmb 01
Show comments