WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यामध्ये तुम्ही तुमचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करू शकता तसेच स्टेटसला ठेवू शकता. याची मूळ कंपनी Meta आहे. व्हॉट्सअॅपचा वापर लाखो वापरकर्ते करतात. त्यामध्ये वापरकर्ते वैयक्तिक आणि अनेक ग्रुपमध्ये जोडले गेलेले असतात. आपण एकमेकांशी संवाद साधत असताना आपले काही फोटोज, व्हिडीओज, ईमोजी, GIF पाठवत असतो. हे सगळे ऑटोमॅटिक तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होत असते.
स्टिकर्स, जिआयएफ , फोटो आणि व्हिडीओ ऑटोमॅटिक तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झाल्यामुळे तुमच्या फोनचे स्टोरेज व्यापते. हा सर्व कंटेंट तुमच्या फोनवर डाउनलोड होऊ नये असे वाटत असते. कारण अनावश्यक कंटेंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ काढावा लागू शकतो. हा कंटेंट ऑटोमॅटिक डाउनलोड होणे टाळण्यासाठी WhatsApp तुम्हाला प्रत्येक चॅटसाठी ऑटो-डाउनलोड सुविधा डिसेबल म्हणजेच बंद करण्याचा पर्याय देते. मात्र हे फिचर बंद करणे काहींसाठी गैरसोयीचे ठरू शकते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
जेव्हा तुम्हाला WhatsApp वर मीडिया फाईल प्राप्त होते. तेव्हा App त्या फाईल्स तुमच्या फोनमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह करते. हे फिचर केवळ त्या नवीन मीडियाला प्रभावित करते जिथे फिचर चालू किंवा बंद केल्यानंतर डाउनलोड केले जाते. जुन्या मीडियाला हे लागू होत नाही.
WhatsApp वर ऑटो-डाउनलोड कसे बंद करावे ?
१. सर्वात प्रथम आपले WhatsApp ओपन करावे.
२. त्यानंतर तुम्हाला ज्या चॅटमध्ये ऑटो-डाउनलोड बंद करायचे आहे त्या चॅटवर क्लिक करावे.
३. चॅटवर क्लिक करून चॅटच्या प्रोफाइलमध्ये जावे.
४. त्यानंतर खाली स्क्रोल करा व मीडिया Visibility वर क्लिक करा.
५. WhatsApp वर ऑटो डाउनलोड बंद करण्यासाठी ”नाही (No)” वर क्लिक करा.
टीप: जर का तुम्हाला ऑटो-डाउनलोड सुरू करायचे असेल तर वरील प्रक्रियेचे अनुसरण करून ”नाही” ऐवजी ”होय (Yes)” वर क्लिक करावे.