काही दिवसांपुर्वी जगभरात व्हॉटसअॅप डाउन झाल्यानंतर मेसेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर अॅप्सची चर्चा सुरू झाली. व्हॉटसअॅपला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या अॅप्सपैकी सर्वाधिक वापरले जाणारे एक अॅप म्हणजे टेलिग्राम. इतर मेसेजिंग अॅप्सशी असणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिग्रामवर लवकरच अनेक नवीन फीचर रोल आऊट करण्यात येणार आहेत. तसेच यावर आधीच उपलब्ध असणाऱ्या शेड्युल फीचरबाबत बऱ्याच जणांना माहिती नाही, जर तुम्ही टेलिग्राम कामानिमित्त वापरत असाल तर हे फीचर अत्यंत उपयुक्त आहे, या फीचरचा वापर करून तुम्ही मेसेज शेड्युल करू शकता. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
टेलिग्रामवर शेड्युल फीचर वापरण्याच्या सोप्या स्टेप्स :
- टेलिग्राम अॅप उघडून, त्यातील ज्या ग्रुपवर किंवा वैयक्तिक चॅटवर मेसेज पाठवायचा आहे ते उघडा.
- त्यानंतर जो मेसेज पाठवायचा आहे तो टाईप करा आणि सेंड बटनावर क्लिक करण्याऐवजी त्यावर लॉन्ग प्रेस म्हणजेच सेंड बटन प्रेस करुन ठेवा.
- त्यावर दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यातील ‘शेड्युल मेसेज’ पर्याय निवडा.
- त्यामध्ये पुढील ३० मिनिटांनी, २ तासांनी, ८ तासांनी यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
- जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या दिवशी मेसेज पाठवायचा असेल तर त्याचाही पर्याय तिथे उपलब्ध होतो, यासाठी ‘डेट’ पर्यायामध्ये तुम्हाला हवी ती तारीख निवडुन, वेळ निवडा.
- त्यानंतर निळ्या सेंड बटनावर क्लिक करा. तुम्ही पाठवलेला मेसेज निवडलेल्या दिवशी आणि त्या वेळेवर पाठवला जाईल.
- या स्टेप्स वापरून तुम्हाला टेलिग्रामवर मेसेज शेड्युल करता येतील.
First published on: 04-11-2022 at 14:53 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to schedule messages on telegram use these easy steps pns