WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. त्यामध्ये व्हिडीओ, फोटो एकमेकांना शेअर करणे, स्टेट्स ठेवणे, लोकेशन, कॉन्टॅक्टस शेअर करणे असे अनेक फिचर यामध्ये मिळतात. व्हॉट्सअॅप तुम्हाला आयफोनवर कॉल लिंक आणि आपल्या कॉन्टॅक्ट्स सेंड करण्याची सुविधा देते. मात्र कॉल लिंक सेंड करूनही काही अनपेक्षित परिस्थितींमुळे तुम्ही एखादा कॉल अटेंड करण्यास विसरू शकता. मात्र आज आपण आयफोनच्या v23.10.76 सह कॅलेंडर App वापरून WhatsApp कॉल शेड्यूल कसे करायचे ते जाणून घेणार आहोत.
या बातमीमध्ये आपण तुमच्या आयफोनवर कॅलेंडर App सह व्हॉट्सअॅप कॉल शेड्युल कसे करायचे याच्या स्टेप्स समजावून घेणार आहोत. हे फिचर सध्या स्थिर बिल्डसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला WhatsApp बीटा प्रोग्रामसाठी साइन अप करण्याची आवश्यकता नाही. या फीचरच्या वापरासाठी तुम्ही आयफोनचे v23.10.76 किंवा त्यावरील अॅप वापरत असल्याची खात्री करावी. याबाबतचे वृत्त guidingtech ने दिले आहे.
हे फिचर केवळ आयफोनवरील कॅलेंडर App साठीच आहे. कदाचित गुगल कॅलेंडर वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आल्याची अपेक्षा आहे. तुमच्या iPhone वर Calendar अॅप वापरून WhatsApp व्हिडिओ कॉल शेड्यूल कसे करायचे याच्या स्टेप्स जाणून घेऊयात.
१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या आयफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करावे.
२. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या खालील बाजूस असलेल्या Call वर क्लिक करा.
३. त्यानंतर क्रिएट कॉल लिंकवर जावे.
४. जेव्हा तुमच्या स्क्रीनवर कॉल लिंक प्रॉम्प्ट दिसेल, तेव्हा खालील बाजूस Add To Calendar वर क्लिक करावे.
हेही वाचा : अमेरिकेतील ‘ही’ कंपनी भारतात करणार तब्बल ३०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक
५. WhatsApp ला तुमच्या कॅलेंडरमध्ये प्रवेश देण्यासाठी OK बटणावर क्लिक करा.
६. यामध्ये टायटल, वेळ आणि रीपिटींग वेळ आणि अन्य गोष्टी प्रविष्ट करा.
७. त्यामध्ये सर्व डिटेल्स भरल्यानंतर वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात ADD वर क्लिक करा.
WhatsApp बंद केल्यानंतर आणि कॅलेंडर App ओपन केल्यावर तुम्हाला तुमच्या सिलेक्ट केलेल्या तारखा आणि टाइम स्लॉटमध्ये WhatsApp कॉल लिंक जोडलेली दिसेल.