व्हॉटसअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत व्हॉटसअॅप वापरत असतो. व्हॉटसअॅपवर चॅटींग, कॉलिंग, व्हिडीओ कॉल, फोटो-व्हिडीओ शेअर करता येणे असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. यातीलच एक लोकप्रिय फीचर म्हणजे स्टेटस. फेसबूक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉटसअॅपवर स्टोरी म्हणजेच स्टेटस ठेवता येण्याचे फीचर २०१७ साली लाँच करण्यात आले. या फीचरचा वापर करून स्टेटसमध्ये फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता येतात, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्या व्यक्तींबरोबर हे स्टेटस शेअर करायचे आहे ते देखील निवडता येते.
व्हॉटसअॅप स्टेटस कोण पाहत आहे हे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीला पाहता येते. पण काही ट्रिक्स वापरून आपण गुपचूप व्हॉटसअॅप स्टेटस पाहू शकतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला आपले नाव व्ह्यूवर लिस्टमध्ये दिसणार नाही. कोणती आहे ती ट्रिक जाणून घ्या.
आणखी वाचा : ट्विटरपाठोपाठ फेसबूकमध्येही मोठी कर्मचारी कपात; नेमकं कारण काय जाणून घ्या
व्हॉटसअॅपवरील ‘रीड रिसिप्ट’ बंद करा
व्हॉटसअॅप सेटींग्स > अकाउंट > प्रायवसी > रीड रिसिप्ट हे पर्याय निवडुन व्हॉटसअॅपवरील ‘रीड रिसिप्ट’ बंद करा. यामुळे तुमचे नाव कोणताही स्टेटस पाहिल्यावर त्या व्यक्तीच्या लिस्टमध्ये दिसणार नाही. तसेच यामुळे चॅट उघडल्यानंतर ‘ब्लु टिक’ येणार नाही. तसेच यामुळे तुम्हालाही तुमच्या स्टेट्सवरील व्ह्यूवर्स लिस्ट दिसणार नाही.
ऑफलाईन स्टेटस पाहा
व्हॉटसअॅप सुरू करून त्यावरील स्टेटस लोड होण्याची वाट बघा, त्यानंतर मोबाईल डेटा किंवा वायफाय बंद करा आणि त्यानंतर स्टेटस पाहा. यामुळे त्या व्यक्तीला तुमचे नाव दिसणार नाही.
‘इनकॉगनिटो मोड’ ऑन करा
डेस्कटॉपवर इनकॉगनिटो मोड ऑन करून व्हॉटसअॅप स्टेटस पाहिल्यास समोरच्या व्यक्तीला तुमचे नाव दिसणार नाही.
‘फाईल मॅनेजर’मधून स्टेटस पाहा
फाईल मॅनेजर > इंटर्नल स्टोरेज > व्हॉटसअॅप > मीडिया > स्टेटस हे पर्याय निवडुन फाईल मॅनेजर मधून स्टेटस पाहिल्यास, व्ह्यूवर्स लिस्टमध्ये तुमचे नाव दिसणार नाही.