व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपल्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्ये बहुतांश सर्वचजण व्हॉटसअ‍ॅप वापरतात. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्क साधणे अगदी सोपे होते, तसेच कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो – व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक अधिकच्या सुविधा या मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. पण कधीकधी हाय क्वालिटी फोटो, व्हिडीओ शेअर केल्यानंतर ते ब्लर होत असल्याचे, त्यांची क्वालिटी खराब होत असल्याचे तुम्हाला जाणवले असेल. शेअर केलेले फोटो किंवा व्हिडीओ ब्लर होऊ नयेत यासाठी काही सोप्या स्टेप्स वापरु शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉटसअ‍ॅपवरून हाय क्वालिटी फोटो, व्हिडीओ शेअर करताना वापरा या स्टेप्स :

  • अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये व्हॉटसअ‍ॅप उघडा, त्यानंतर वरच्या बाजुला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करून सेटींग्स पर्याय निवडा.
  • त्यामध्ये ‘स्टोरेज अँड डेटा’ पर्याय निवडा. त्यानंतर ‘फोटो अँड क्वालिटी’ पर्याय निवडा.
  • आता यामध्ये बेस्ट क्वालिटी पर्याय निवडा, अशाप्रकारे हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडीओ शेअर करता येतील.

आणखी वाचा : आता इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये ॲड करता येणार गाणे! काय आहे नवे फीचर जाणून घ्या

या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडीओ ब्लर न होता शेअर करू शकता. तसेच या पर्यायामुळे तुम्हाला पाठवण्यात आलेले फोटो किंवा व्हिडीओ देखील ब्लर न होता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करता येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to send high quality photo and video through whatsapp without getting blur know easy process pns