Netflix काही महिन्यांपासून पासवर्ड शेअरिंगवर कडक कारवाई करताना दिसत आहे. Netflix हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये एक व्यक्ती अकाउंट ओपन करतो त्यासाठी सबस्क्रिप्शन घेतो. त्या अकाऊंटवर इतर सदस्य मनोरंजनाचा आनंद घेतात. ही नेटफ्लिक्सची कार्यपद्धती आहे. कदाचित याच कारणांमुळे स्ट्रीमिंग जायंट भारतीय वापरकर्त्यांसाठी एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनला आहे. मात्र आता ही कार्यपद्धती बंद करण्यासाठी नेटफ्लिक्स उपाययोजना करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आता युजर्सना ईमेल पाठवून सांगत आहे की त्यांचे अकाउंट फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातील सदस्यांसाठी आहे.

Netflix ने भारतात बंद केले पासवर्ड शेअरिंग

नेटफ्लिक्सने आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले, “आजपासून, आम्ही हा ईमेल भारतातील त्यांच्या घराबाहेर नेटफ्लिक्स शेअर करणाऱ्या सदस्यांना पाठवणार आहोत. नेटफ्लिक्स अकाउंट हे एका कुटुंबाच्या वापरासाठी आहे. त्यात घरात असणारे प्रत्येक सदस्य हे वापरू शकतो. घरी असताना, बाहेर असताना, सुट्टीवर असताना ते कुठेही असले तरी नेटफ्लिक्स वापरू शकतात. तसेच ट्रान्सफर प्रोफाइल आणि ॲक्सेस व डिव्हाइसेस मॅनेज करण्यासाठी नवीन फीचर्सचा लाभ घेऊ शकतात.” याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
PM Modi-Omar Abdullah
PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

हेही वाचा : Netflix चा मोठा निर्णय! आजपासून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद, जाणून घ्या नेमका बदल…

Netflix हाऊसहोल्ड अकाउंट काय आहे ?

नेटफ्लिक्स हाऊसहोल्ड हे असे एक फिचर आहे जे तुम्हा तुमचे नेटफ्लिक्स अकाउंट तुमच्या घरात राहणाऱ्या सदस्यांसह शेअर करण्याची परवानगी देते. तुमच्या घरातील कोणीही त्याच इंटरनेट कनेक्शनला कनेक्ट केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर Netflix पाहू शकते.

नेटफ्लिक्स हाऊसहोल्ड अकाउंट कसे सेट करायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या टीव्हीवरील Netflix होम स्क्रीनवर जाऊन मेनू ओपन करावा.

२. त्यानंतर ‘Get help’ हा पर्याय निवडा. नंतर ‘Manage Netflix Household.’ क्लिक करावे.

३. तुम्हाला तुमचे सध्याचे अकाउंट नेटफ्लिक्स हाऊसहोल्ड करायचे आहे की अपडेट करायचे आहे याची खात्री करावी.

४. त्यानंतर तुम्ही ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवण्याचा पर्याय निवडा. थोड्या कालावधीने तुम्हाला तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवर एक लिंक प्राप्त होईल. मात्र १५ मिनिटांनंतर ही लिंक कालबाह्य होईल हे लक्षात घ्यावे.

हेही वाचा : लवकरच ‘या’ युजर्ससाठी लॉन्च होणार ChatGpt अ‍ॅप, या निर्णयामुळे गुगल बार्डचे टेन्शन वाढणार?

५. तुम्हाला ईमेल मिळाल्यानंतर तो ओपन करावा आणि कन्फर्म करण्यासाठी “Yes, This Was Me” वर क्लिक करा. तसेच तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला असल्यास दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

६. आता तुम्ही नेटफ्लिक्स हाऊसहोल्ड कन्फर्म करा किंवा ते अपडेट करण्यासाठी पुढे जा.

७. कन्फर्मेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्हला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक कन्फर्मेशन मेसेज दिसेल. तसेच आणखी ईमेल देखील प्राप्त होईल.

८. त्यानंतर तुम्ही तुमचे आवडते शो आणि पिक्चर पाहण्यासाठी “Continue to Netflix” हा पर्याय निवडावा.

Story img Loader