प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्मार्टफोन म्हटलं की फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अ‍ॅप आलेच. आजच्या काळात सोशल मीडियाशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करता येत नाही. कारण बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट राहतात. अशा परिस्थितीत, असे बरेच वेळा दिसून आले आहे की लोक फेसबुक आणि इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवतात. या अ‍ॅपमुळे युजर्स तासोतास आपला वेळ त्यावर वाया घालवतात. एकप्रकारे प्रोफाईल वारंवार बघण्याचं व्यसन लागतं. यासाठी फेसबुकने २०१८ मध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी टाईम लिमिट फिचर अ‍ॅड घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकने यासाठी मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि इतर संस्थांशी सल्लामसलत करून हे फिचर अ‍ॅड केले आहे.

फेसबुकचं टाईम लिमिट फिचर वापरत असताना सरासरी वेळ लक्षात घेऊन तुम्हाला दररोज किंवा साप्ताहिक अहवाल देईल. यामुळे तुम्ही कोणत्या दिवशी किती तास फेसबुकवर स्क्रोल केले. डेली अलर्ट फीचर देखील देखील आहे, जे तुम्हाला वेळ मर्यादा सेट केल्यानंतर फेसबुकचा अधिक वापर केल्यास अलर्ट करेल.

टाईम लिमिट फिचर कसे सक्रिय करावे

  • Android किंवा iOS स्मार्टफोनमध्ये फेसबुक प्रोफाइल उघडा.
  • त्यानंतर मेनू पर्यायावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा आणि Settings & Privacy वर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला सिलेक्ट सेटिंगचा पर्याय दिसेल ज्यामध्ये ‘प्रेफरन्स’ सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर Set Daily Time Reminder वर क्लिक करून वेळ सेट करा.
  • यानंतर तुमच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये टाइम लिमिट रिमाइंडर सेट होईल.