आजकाल प्रत्येक लहान मुलाचा मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक लहान मुलं तर मोबाईल नसेल तर जेवत सुद्धा नाहीत, त्यामुळे त्यांचा हट्ट नाईलाजाने पालकांना पूर्ण करावा लागतो. पण या वाढलेल्या स्क्रिन टाइममुळे लहान मुलांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन त्यांची दृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांवर वाईट परिणाम होण्याची चिंता पालकांना सतावत आहे. या टेन्शनपासून सुटका मिळवण्यासाठी ‘पॅरेंटल कंट्रोल’ हा गूगलवर उपलब्ध असणारा पर्याय मदत करू शकतो. याचा वापर करून पालक मुलांच्या फोनवर नियंत्रण मिळवू शकतात. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गूगल प्ले स्टोअरवर असे वापरा ‘पॅरेंटल कंट्रोल’

  • गूगल प्ले स्टोअर उघडून त्यातील उजव्या बाजुला असणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यामध्ये सेटिंग्समधील ‘फॅमिली’ पर्याय निवडून त्यातील ‘पॅरेंटल पर्याय’ निवडा.
  • त्यामध्ये पिन सेट करा, हा पिन जेव्हा सेटींग्स बदलण्यात येतील किंवा ‘पॅरेंटल सेटींग्स’ बंद करण्यात येतील तेव्हा प्रत्येकवेळी विचारला जाईल.
  • पिन सेट झाल्यानंतर तुम्ही मुलांना कोणता कंटेन्ट पाहता येईल हे सेट करू शकता. ७ वर्षांवरील मुलांसाठी, १२,१६,१८ वर्षांवरील मुलांसाठी असे पर्याय तिथे उपलब्ध होतात.

याशिवाय मुलांना अयोग्य वेबसाईट्स बघण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ‘फॅमिली लिंक ॲप’ वापरू शकता. हे ॲप वापरुन मुलांचा स्क्रीन टाइम, ते कोणत्या वेबसाईट पाहतात यावर नियंत्रण मिळवता येईल. हे ॲप वापरण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.

  • तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या फोनमध्ये ‘फॅमिली लिंक ॲप’ डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुमचे आणि तुमच्या मुलाचे गूगल अकाउंट लिंक करण्यास सांगितले जाईल.
  • ही लिंक प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही सहजरित्या तुमच्या मुलांच्या फोनवर नियंत्रण मिळवू शकता.