ChatGpt हा चॅटबॉट ओपनएआय कंपनीने मागील वर्षी लॉन्च केला आहे. सध्या सर्वत्र याचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यापीठांनी तर यावर बंदी देखील घातली आहे. ChatGpt हा चॅटबॉट आहे जो आकर्षक आणि वास्तववादी कंटेंट तयार करतो. कामाचा त्रास कमी व्हावा म्हणून याचा वापर करण्यात येत आहे. आज आपण तुम्ही chatgpt वर केलेला संवाद शेअर कसा करायचा ते पाहणार आहोत.

कंपनीने ChatGPT Shared Links नावाचे एक फिचर सुरू केले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या संवादाची लिंक तयार आणि शेअर करण्याची परवानगी देते. याची लिंक कशी तयार करायची आणि ती शेअर कशी करायची, यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त guidingtech ने दिले आहे.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हेही वाचा : Tech Gadgets: ५०० रुपयांच्या आतमध्ये खरेदी करता येणार ‘ही’ पाच गॅजेट्स, असा होतो उपयोग

ChatGPT चॅटची लिंक कशी तयार करावी ?

संवादाची लिंक कशी तयार करण्यापूर्वी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सध्या हे browser व्हर्जनमधून शेअर करता येणार आहे. लवकरच हे ios आणि चॅटजीपीटी App ही सुविधा सुरू करण्यात येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

१. कोणत्याही ब्राउझरवर जाऊन ChatGpt वर क्लिक करावे आणि लॉग इन करावे. आधीपासून लॉग इन असल्यास पुन्हा करण्याची आवश्यकता नाही.

२. चॅटजीपीटीच्या चॅट हिस्ट्री असलेल्या साईडबारवर क्लिक करावे.

३. तुम्हाला जे चॅट शेअर करायचे आहे त्याची हिस्ट्री सिलेक्ट करावी.

४. त्यानंतर चॅटवर शेअर आयकॉन क्लिक करा.

५. शेअर करताना तुम्ही चॅटचे नाव बदलू शकता किंवा तुमचे नाव दिसू नये यासाठी पर्याय निवडू शकता.

६. सर्व आवश्यक बदल केल्यास कॉपी लिंकवर क्लिक करा.

७. ज्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक शेअर करायची आहे त्या ठिकाणी लिंक शेअर पेस्ट करावी.

हेही वाचा : अधिक Validity असलेला रिचार्ज प्लॅन शोधताय? Airtel ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त प्लॅन, जाणून घ्या

ChatGPT चॅट लिंक कशी डिलीट करावी ?

१. सर्वात पहिल्यांदा ChatGpt वर शेअर केलेले चॅट उघडावे.

२. शेअर बटणावर क्लिक करावे.

३. त्यानंतर तिथे एक तीन डॉट असलेले आयकॉन दिसेल.

४.डिलीट करायची असलेली लिंक सिलेक्ट करावी.