Steps To Spot Instagram Stalkers And Block Them : फोटो शेअरिंग, मेसेजिंग व व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल, रील आदी फीचर्सचा ऑफर करणारे इन्स्टाग्राम (Instagram) ॲप तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तुमचे अकाउंट खासगी असो किंवा पब्लिक तुमचे अकाउंट पाहणारे सर्व युजर्स चांगले नसतात. काही जणांकडून वाईट हेतूने या ॲपचा वापर केला जाऊ शकतो. काही लोक तुमच्या फॉलोअर्सच्या यादीत नसतात. पण तरीही ते प्रोफाईल शोधून, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये काय पोस्ट करताय याचे निरीक्षण करू लागतात आणि तुमच्या प्रायव्हसीला हानी पोहोचवू शकतात.त्यामुळे प्रायव्हसी (गोपनीयता) राखण्यासाठी तुमचे प्रोफाईल स्टॉकर्सपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन, इन्स्टाग्राम तुमचे प्रोफाइल कोण स्टॉक करत आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला एक सेटिंग ऑफर करीत आहे (How To Spot Instagram Stalkers). तुमचे खाते सुरक्षित कसे करायचे ते चला पाहू…

इन्स्टाग्राम स्टॉकर्सला शोधण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी पायऱ्या (How To Spot Instagram Stalkers)

१. इन्स्टाग्राम ॲप उघडा – प्रोफाईल चिन्हावर टॅप करून, तुमच्या प्रोफाईलवर जा.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा

२. ॲक्सेस सेटिंग्ज – उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन रेषांवर (हॅम्बर्गर मेन्यूवर) क्लिक करा आणि ‘Blocked’ विभागात जा.

हेही वाचा…फक्त रॅम नाही, भरपूर स्टोरेजपण देणार; OnePlus 13 ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार!

३. सजेशन एक्सप्लोर करा – ब्लॉक यादी खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला “You May Want to Block” असे लेबल असलेला पर्याय दिसेल.

४. आयडेंटिफाय स्टॉकर (Identify stalkers)- हा विभाग तुमच्या प्रोफाRलला वारंवार भेट दिलेल्या लोकांची यादी तयार करतो. जर तुम्हाला या यादीमध्ये कोणी संशयास्पद दिसले, तर तुम्ही तुमच्या प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी त्यांना त्वरित ब्लॉक करू शकता.

मेटा-मालकीचे Instagram आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रायव्हसी (गोपनीयता) फीचर्स (How To Spot Instagram Stalkers) प्रदान करतो. या सेटिंग्जचा वापर करून, तुम्ही अनोळखी व्यक्ती किंवा स्टॉकर्स तुमच्या प्रोफाईलचा गैरवापर करीत नाही ना हे ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या ॲपची मदत घेण्याची गरज नाही.

Story img Loader