How To Start Threads On Instagram: कालपासून आपणही अनेकांच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये थ्रेड्स हा प्रकार बघत असाल, तुम्ही जर अगदीच टेक सॅव्ही असाल तर तुम्हीही कदाचित आतापर्यंत हा प्रयोग करूनही पाहिला असेल पण जर अजूनही तुम्हाला थ्रेड्स हा प्रकार काय आणि तो कसा वापरायचा याबाबत माहिती नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. मार्क झुकेरबर्गने नुकतीच थ्रेड्स या नव्या कोऱ्या कल्पनेची प्रारंभिक आवृत्ती जाहीर केली आहे . Play Store किंवा अॅप स्टोअरवरून थ्रेडस हे App डाउनलोड केल्यावर थ्रेड्स वापरणे अगदी सोपे आहे: लॉग इन करण्यासाठी फक्त तुमच्या Instagram खात्याचे युजरनेम व पासवर्ड वापरा. यांनतर थ्रेड कसा ऍड करायचे हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया
तुम्ही थ्रेड कसे सुरु कराल? (How To Start Threads On Instagram)
- थ्रेड ऍप डाउनलोड केल्यावर खाली दिसणाऱ्या कोपऱ्यात + दिसेल त्यावर टॅप करा.
- तुम्हाला तुमच्या थ्रेडमध्ये काय शेअर करायचे आहे ते लिहा.
- तुमच्या थ्रेडवर फोटो किंवा व्हिडिओ जोडण्यासाठी attach वर क्लिक करा. इथे तुम्ही जास्तीत जास्त 10 गोष्टी निवडू शकता निवडा. यानंतर वरील बाजूस उजवीकडे Done (Android) किंवा Add (iPhone) वर टॅप करा.
- तुमच्या थ्रेडमध्ये जोडण्यासाठी, थ्रेडमध्ये Add वर टॅप करा. तुमच्या थ्रेडमध्ये 500 पेक्षा जास्त कॅरेक्टरचा असल्यास, त्याचे विभाजन करून ५०० च्या वरील मजकूर हा दुसऱ्या थ्रेडमध्ये आपोआप जोडला जाईल.
- तुमच्या थ्रेडला कोण प्रत्युत्तर देऊ शकेल हे बदलण्यासाठी, तळाशी डावीकडे कोणीही प्रत्युत्तर देऊ शकते टॅप करा. तुम्ही फॉलो केलेल्या किंवा फक्त उल्लेख केलेल्या प्रोफाइलला रिप्लाय उत्तर देऊ शकेल हे तुम्ही नियंत्रित करू शकता.
- तळाशी उजवीकडे पोस्ट टॅप करा. तुमचा थ्रेड पोस्ट केला जात असताना तुम्हाला वरच्या बाजूला प्रोग्रेस बार दिसेल.
लक्षात ठेवा की जर कोणी तुमच्या थ्रेडला रिप्लाय केला आणि तुम्ही तुमचा थ्रेड डिलीट केला तर त्यांचे रिप्लाय तुम्हाला डिलीट करता येणार नाही. थ्रेडला दिलेला रिप्लाय तुम्ही फॉलो करत नसलेल्या खाजगी प्रोफाइलवरून दिलेला असल्यास, तुम्ही त्यांचे रिप्लाय पाहू शकणार नाही.
थ्रेडसचे नियम व अटी (Threads Rules And Regulations)
- १६ वर्षाखालील (किंवा विशिष्ट देशांमध्ये १८ वर्षाखालील) प्रत्येकाचे अकाउंट हे खाजगी प्रोफाइलमध्येच टाकले जाईल.
- तुम्ही Instagram वर फॉलो करत असलेले अकाउंट तुम्ही इथेही फॉलो करू शकता शिवाय अन्य लोकांशीही जोडले जाऊ शकता.
- तुमच्या थ्रेडवरील फीडमध्ये तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांद्वारे पोस्ट केलेले थ्रेड दिसतीलच त्याशिवाय ज्याप्रमाणे तुम्हाला काही सुचवलेल्या अकाऊंटच्या प्रोफाइल इंस्टाग्रामवर दिसतात त्याचप्रमाणे काही थ्रेडस सुद्धा दिसून येतील.
- पोस्टसाठी 500 कॅरेक्टर इतकी टेक्स्ट मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिवाय 5 मिनिटांपर्यंत लिंक, फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट असू शकतात.
- तुम्ही तुमच्या Instagram स्टोरीवर सुद्धा हे थ्रेड पोस्ट शेअर करू शकता
- तुम्ही निवडलेल्या इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुमची पोस्ट लिंक म्हणून शेअर करू शकता.