Mobile Hack : प्रत्येकाच्या हातात सतत असणारी गोष्ट म्हणजे स्मार्टफोन. प्रवास असो किंवा कामातून काढलेला ब्रेक प्रत्येक जण सतत स्मार्टफोनमध्ये व्यग्र असतो. यामागचे कारणही तसेच आहे. मनोरंजन करण्यासह स्मार्टफोनमुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सहजरित्या एका क्लिकवर करता येतात. त्यामुळे प्रत्येक काम करण्यासाठी आपण मोबाईलचा आधार घेतो. पण अनेकवेळा मोबाईलवर येणाऱ्या जाहीराती आपल्याला त्रासदायक वाटतात. एक सोपी ट्रिक वापरुन या जाहीरातींपासून सुटका मिळवता येते. कोणती आहे ही ट्रिक जाणून घ्या.

मोबाईलवर सतत येणाऱ्या जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा या स्टेप्स

  • सर्वात आधी क्रोम ब्राउजर उघडा, त्यामध्ये वरच्या बाजुला तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करा.
  • त्यामध्ये सेटींग्स पर्याय निवडून खाली स्क्रोल करा, तिथे साईट सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये पॉप अप्स अँड रिडायरेक्ट पर्याय निवडा. तिथे तुम्हाला एक टॉगल दिसेल, त्या टॉगलला ऑन करा. त्यानंतर पुन्हा साईट सेटिंग पेजवर जा.
  • यानंतर तिथे जाहीरातींचा (ऍड्स) पर्याय दिसेल, त्यामधील पॉप अप ब्लॉक हा पर्याय निवडा.
  • हा पर्याय निवडल्यानंतर नको असणारे पॉप अप आणि जाहिराती ब्लॉक होतील.
  • याव्यतिरिक्त जर तुम्हाला फोन मध्ये येणाऱ्या सर्वच जाहिराती ब्लॉक करायच्या असतील तर तुम्ही थर्ड पार्टी ॲप्सचे एक्सटेन्शन वापरू शकता.
  • तसेच अशा जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वेगळ्या ब्राउजरचे पर्याय वापरु शकता.