ईमेल करण्यासाठी जगात सर्वाधिक जीमेल सेवेचा वापर केला जातो. लोक मेसेज, रिझ्यूमे आणि कामाची माहिती पाठवण्यासाठी त्याचा वापर करतात. मात्र कालांतराने ते अनेक स्पॅम, अनावश्यक ईमेल्सने भरून जाते. यामुळे स्टोअरेज कमी होते.

स्वत: इमेल्स सिलेक्ट करून तुम्ही अनावश्यक ईमेल्स डिलिट करू शकता. पण अनेक इमेल्स डिलिट करणे हे वेळखाऊ आणि डोकेदुखी ठरते. पण जीमेलच्या एका फीचरने एका विशिष्ठ सेंडरकडून आलेले इमेल्स आपोआप डिलिट होऊ शकतात. याने केवळ त्या सेंडरचेच इमेल्स डिलिट होतील. तुम्हाला गरेजेचे असलेले इमेल्स डिलिट होणार नाहीत. या विशिष्ठ सेंडरकडून येणारे इमेल्स आपोआप डिलिट होत राहतील.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
india post payment bank scam
India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय

(‘या’ प्लान्सवर एका वर्षांसाठी मिळतय फ्री डिझनी हॉटस्टार सब्सक्रिप्शन, जाणून घ्या ऑफर)

असे वापरा फीचर

  • संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड किंवा आयओएस उपकरणावर जीमेल उघडा.
  • सर्चबार शेजारील ‘शो सर्च ऑप्शन्स’ आयकनवर क्लिक करा.
  • ‘फ्रॉम’ बॉक्समध्ये सेंडरचे नाव टाका.
  • त्यानंतर ‘क्रिएट फिल्टर’ सिलेक्ट करा आणि ‘डिलिट इट’ हे फिल्टर निवडा.
  • त्यानंतर परत ‘क्रिएट फिल्टर सिलेक्ट’ करा.

यानंतर भविष्यात या सेंडरकडून येणारे सर्व मेल्स आपोआप डिलिट होतील. याद्वारे तुमच्या जीमेल इन्बॉक्समध्ये अनावश्यक ईमेल जमा होणार नाही. सेंडरचे नाव टाकताना तुम्ही एकापेक्षा अधिक नाव टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही अनेक फिल्टरपैकी गरजेनुसार एक फिल्टर निवडून त्याचा वापर करू शकता. आरकाइव्ह, मार्क अ‍ॅज रीड, स्टार, फॉरवर्ड आणि मार्क अ‍ॅज इम्पॉर्टंट असे फिल्टर्स आहेत. सिलेक्ट केल्यास सेंडरकडून आलेल्या इमेल्सवर जी कारवाई करायची आहे ते जीमेल करेल.

Story img Loader