जर तुम्ही विविध व्यवसाय करीत असाल, कन्टेन्ट क्रिएशन करीत असाल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी इन्स्टाग्रामचा वापर करीत असाल, तर प्रत्येक कामासाठी तुम्ही वेगवेगळे इन्स्टाग्राम अकाउंट बनवणे गरजेचे असते. परंतु, एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या साईटची किंवा क्लोनिंग अॅपची गरज नाहीये. मग काय करायचे? त्यासाठी या सोप्या स्टेप्स तुम्हाला मदत करतील.

अॅण्ड्रॉइड आणि आयफोनमध्ये एकपेक्षा जास्त अकाउंट कशी अॅड करायची?

१. सगळ्यात पहिल्यांदा फोनमधील इन्स्टाग्राम अॅप उघडून, उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या प्रोफाइलवर क्लिक करा.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Battery Saving Tips For Laptop
Battery Saving Tips For Laptop : काम करताना लॅपटॉप सारखा चार्ज करावा लागतो का? मग या सेटिंग्जमध्ये आजच करा बदल

२. आता वर तुमच्या नावासमोर एक बाण दिसेल. त्यावर क्लिक करून, ‘अॅड अकाउंट’वर क्लिक करा.

३. ‘लॉग इनटू एक्झिस्टिंग अकाउंट’ हा पर्याय निवडून, आपले युजरनेम व पासवर्ड टाका. [तुमचे अकाउंट अॅड होईल]

४. अजून जास्त अकाउंट अॅड करायची असल्यास याच स्टेप्सचा वापर करा.

सगळी अकाउंट्स अॅड तर झाली. पण आता एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर कसे जायचे तेदेखील पाहा…

हेही वाचा : AI तंत्रज्ञान, चॅट जीपीटी नव्हे, तर ॲपल आणि गुगलनुसार ‘हे’ ठरलेत २०२३ चे सर्वोत्कृष्ट गेम्स आणि ॲप्स!

अकाउंट स्विच कसे करावे?

१. प्रोफाइल टॅबवरून अकाउंट स्विच करा

ईन्स्टाग्राम अॅप उघडून, त्यातील प्रोफाइल टॅबवर क्लिक करा

आपल्या युजर नेम शेजारी असणाऱ्या बाणावर क्लिक करून, तुम्हाला हवे ते अकाउंट निवडा.

अथवा प्रोफाइल टॅब काही सेकंदांसाठी दाबून ठेवा आणि त्यानंतर तिथे आलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला हवे ते अकाउंट निवडा.

२. डबल टॅप करून स्विच करावे अकाउंट

इन्स्टाग्राम अकाउंट उघडून, प्रोफाइल टॅबवर भरभर दोनदा टॅप केले तरीदेखील तुम्हाला अकाउंट स्विच करता येऊ शकते.

डेक्सटॉपवर एकापेक्षा जास्त अकाउंट कसे उघडावे?

१. इन्स्टाग्राम डॉट कॉम ही वेबसाइट उघडून, त्यात एका अकाउंटसोबत लॉग इन करावे.

२. होम टॅबमधील स्विच या पर्यायावर क्लिक करा.

३. ‘लॉग इनटू एक्झिस्टिंग अकाउंट’ हा पर्याय निवडून, त्यात युजर नेम व पासवर्ड टाकून ‘सेव्ह लॉग इन इन्फो’वर क्लिक करून, लॉग इन करावे.

डेक्सटॉपवर अकाउंट्समध्ये स्विच कसे करावे?

१. गूगल क्रोम उघडून, त्यामध्ये इन्स्टाग्राम डॉट कॉम ही वेबसाइट उघडून घ्यावी.

२. युजर नेमसमोर असलेल्या ‘स्विच’ किंवा ‘मोअर’ या पर्यायावर क्लिक करा.

३. तुम्हाला हवे असलेले अकाउंट निवडा.

या स्टेप्सचा वापर करून, तुम्ही कोणत्याही ठिकाणी आपले अकाउंट अॅड किंवा स्विच करू शकता.