फेसबुक आणि ट्विटरचा वापर जगभरातील तरुणांसह प्रौढ, सेलिब्रिटीही करतात. त्यापैकी बरेच लोक या दोन्ही सोशल साइट्सचा मनोरंजनासाठी वापर करतात. पण असे काही लोक आहेत जे फेसबुक आणि ट्विटरचा वापर फक्त माहिती वाढवण्यासाठी करतात. अशावेळी या साइट्सवर शेअर केलेले व्हिडीओ अशा लोकांना खूप त्रास देतात. कारण हे व्हिडीओ ऑटोप्लेमुळे स्क्रोलिंग करताना आपोआप प्ले होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ऑटोप्लेमुळे युजर्सचा वेळ तर वाया जातोच पण मोबाईल डेटाचाही वापर होतो. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर हे टाळण्यासाठी ऑटोप्लेचे फीचर बंद केले जाऊ शकते. यानंतर तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर आरामात स्क्रोल करू शकता.

(हे ही वाचा: Google Maps चं जबरदस्त फिचर! इंटरनेट नसतानाही दाखवेल मार्ग, जाणून घ्या कसं)

कसं करायचं बंद?

फेसबुकवर व्हिडीओ ऑटोप्ले बंद करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये सर्वात सोपा मार्ग आम्ही सांगत आहोत.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक उघडावे लागेल.

यानंतर, वरच्या उजव्या बाजूला हॅम्बर्ग चिन्हावर क्लिक करा. येथे Settings and Privacy या पर्यायावर क्लिक करा.

(हे ही वाचा: Jio Recharge Plan: ‘हा’ प्लॅन झाला १०० रुपयांनी स्वस्त! सोबत मिळणार अनेक फायदे)

यानंतर, सेटिंग निवडल्यानंतर, खाली स्क्रोल करा आणि खाली या आणि प्रेफरन्स विभागात जा आणि मीडियावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. ऑटो प्ले सेक्शनमध्ये तुम्हाला मोबाईल डेटा आणि वायफाय, ऑन वाय-फाय आणि नेव्हर ऑटो प्ले असे तीन पर्याय मिळतील.

ज्यामध्ये तुम्हाला Never auto play पर्याय निवडावा लागेल आणि आपोआप व्हिडीओ प्ले होणे बंद होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to turn off auto play video on facebook twitter learn simple steps ttg