रस्त्यावर गाडी चालवताना सर्वांना ओव्हर स्पीडिंगमुळे पावती फाडावी लागेल अशी भिती वाटते. इतर देशांप्रमाणेच भारतामध्ये रस्त्यांवर ओव्हर स्पीडिंग थांबवण्यासाठी स्पीड सेंसिंग कॅमेरे लावले आहेत जे स्पीड निश्चित लिमिटच्यावर चालवणाऱ्या वाहनांना कॅप्चर करते आणि त्यांची ऑनलाईन पावती तयार करते. तुम्हाला या समस्येपासून आता गुगल मॅप्स वाचवू शकते. तुम्हाला माहितीये का गुगल मॅप्समध्ये एक खास फिचर असते जे वाहनाची स्पीड लिमिटपेक्षा जास्त असेल तर युजरला अर्लट पाठवते?
गुगल मॅप्सचे हे स्पीडोमीटर फिचर युजर्सला ते जात असलेल्या रस्त्यावर स्पीड लिमिटबाबत अलर्ट पाठवते. पण गुगल मॅप्स सांगते की, स्पीडोमीटर हे केवळ माहितीसाठी आहे. यूजर्सने केवळ त्यावर अवलंबून राहू नये तर स्वत: आपल्या वाहनाचा स्पीडोमीटर चेक करत राहावे.
येथे आम्ही तुम्हाला गुगल मॅप्सला स्पीड लिमिट फिचर कसे वापरावे याची पद्धत सांगणार आहोत. या स्टेप्स Android आणि iOS दोन्हीसाठी सारख्याच आहेत.
हेही वाचा – वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो तुमचा फोन, कोणतीही वायर न जोडता आत कशी जाते वीज? जाणून घ्या
गुगल मॅप्सवर स्पीड लिमिट फिचर कसे सुरू करावे
- गुगर मॅप्स सुरू करा
- वरच्या उजव्या कोपऱ्यात, प्रोफाइल पिचरवर टॅप करा.
- आता ‘सेटिंग्ज’ वर जा.
- आता ‘नेव्हिगेशन सेटिंग’ वर टॅप करा.
- जोपर्यंत तुम्हाला ‘स्पीड लिमिट्स’ पर्याय दिसत नाही तोपर्यंत खाली स्क्रोल करत रहा.
- आता ते चालू करण्यासाठी या पर्यायासमोरील टॉगल बटणावर टॅप करा.
हेही वाचा – उन्हाळ्यात AC वापरताना लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी, तुमचे वीज बिल येऊ शकते कमी!
यानंतर, जर युजर्स कोणत्याही रस्त्यावर वेग मर्यादेपेक्षा जास्त वाहन चालवत असेल तर त्याला गुगल मॅपद्वारे सूचित केले जाईल. पण, आम्ही सांगितल्याप्रमाणे, Google मॅप्स सल्ला देतो की यूजर्सने त्यांच्या वाहनाच्या स्पीडोमीटरवर लक्ष ठेवावे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वेग मर्यादा चिन्हे देखील तपासावीत.