आपले मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी किंवा आपले फोटो स्टोरीला किंवा पोस्ट करण्यासाठी इंस्टाग्राम हे एक चांगले App आहे. मात्र कधीकधी असे काही घडते की आपण एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक करतो. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र जर का आपल्याला इंस्टाग्रामवर एखाद्याला अनब्लॉक करायचे आहे . तर ते कसे करायचे याबद्दलच्या सोप्या स्टेप्स आज आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंस्टाग्रामवर एखाद्याला Unblock कसे करायचे ?

१. सर्वात प्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करावे लागेल.

२. अ‍ॅप ओपन केल्यानंतर खालील बाजूला असलेल्या बारमधून तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करावे.

हेही वाचा : I/O Connect Bangalore: भारतीय डेव्हलपर्ससाठी गूगलने केली AI टूल्ससह ‘या’ फीचरची घोषणा

३. त्यानंतर तुमच्या प्रोफाइल पेजवर वरच्या बाजूला तीन बारचे बटण असेल. तिथे क्लीक करावे.

४. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘सेटिंग्ज आणि प्रायव्हसी’ यावर क्लीक करावे.

५. सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर क्लिक केल्यानंतर Who can see your content’ या सेक्शनमध्ये ‘Blocked’ या पर्यायावर टॅप करावे.

६. तिथे तुम्हाला तुम्ही ब्लॉक केलेल्या अकाउंट्सची यादी दिसेल.

८. अनब्लॉक बटण प्रेस केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीची प्रोफाइल आणि कंटेंट पाहू शकता.

हेही वाचा : Vodafone-Idea: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो Disney+ Hotstar चा आनंद, जाणून घ्या

तुम्हाला कोणी ब्लॉक किंवा अनब्लॉक केले असेल तर इंस्टाग्राम तुम्हाला त्याबद्दल काही सूचना देत नाही. जर का तुमचे फेसबुक अकाउंट मेटा अकाउंट सेंटरशी लिंक केलेले असल्यास तुम्ही ज्यांना ब्लॉक करू इच्छित आहात अशा लोकांची यादी देखील तुम्ही फेसबुक अकाउंटवरील मेसेंजिंग अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारे पाहू शकता.

तसेच एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक करायचे असेल तर, त्याच्या प्रोफाईलवर जावे. वरील बाजूस असलेल्या तीन बार मेनूवर क्लिक करावे. त्यानंतर ब्लॉक बटणवर क्लिक करावे.

सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया प्रत्येकजण वापरतो. त्यामध्ये WhatsApp, Instagram आणि facebook आणि अन्य Apps आपण वापरत असतो. त्यामध्ये रिल्स तयार करण्यासाठी प्रसिद्ध झालेले एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवर हल्ली रिल्स करण्याचे प्रमाण वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपले रिल्स तयार करून पोस्ट करताना दिसून येत आहेत. तर रिल्स पाहणाऱ्या लोकांची संख्या देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to unblock someone user account on instagram famous for post reels tmb 01