How to unsend an email in Gmail : एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी रेझ्युमे पाठवण्यासाठी, कामाच्या ठिकाणी अधिकृत संवादासाठी एखादा मेसेज करायचा असेल तर आपण ईमेलचा उपयोग करतो. संवाद साधण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग आहे; जो विविध फॉरमॅट पर्यायांसह येतो. ईमेल युजर्सना फोटो व डॉक्युमेंट जोडण्यास (अटॅच) परवानगी देतो. पण, अनेकदा असं होतं की, फोटो, डॉक्युमेंट जोडण्यास (अटॅच) विसरतो किंवा काही वेळा ईमेल पाठवल्यानंतर एखादी महत्त्वाची माहिती नमूद करायची राहून जाते किंवा मजकुरात एखादी चूक राहते. तर अशा परिस्थितीत काही जण दुसरा मेल पाठवतात. पण, अशी समस्या जर तुमच्या समोर आली तर तुम्ही अगदी ५ ते ३० सेकंदात तुमचा ईमेल UNDO करू शकता.
जर तुम्हालाही हे फीचर उपयोगी वाटत असेल तर तुम्हीसुद्धा पुढील स्टेप्सच्या मदतीने ईमेल UNDO करू शकता…
पायरी १ : जीमेल सेटिंगमध्ये जा.
”Undo Send’ फीचर इनेबल करण्यासाठी वेब किंवा पीसीवरून जीमेलमधील सेटिंग्ज मेनूवर जा, गीअर चिन्हावर क्लिक करा, नंतर ‘सी ऑल सेटिंग्ज’ निवडा.
पायरी २ : Undo Send एनेबल करा.
सेटिंग्ज मेनूमध्ये, ‘जनरल’ टॅबवर जा आणि ‘Undo Send’ पर्याय शोधा. ‘एनेबल Undo Send’ असा लिहिलेला पुढील बॉक्स चेक करा. तिथे तुम्ही कॅन्सलेशन पिरेड ५, १०, २० किंवा ३० सेकंदांच्या वेळेचा पर्याय निवडू शकता.
पायरी ३ : बदल केलेलं सेव्ह करा
‘Undo Send’ फीचर एनेबल केल्यानंतर आणि कॅन्सलेशन पिरेड सेट केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करा.
पायरी ४ : एक नवीन संदेश तयार करा
नेहमीप्रमाणे तुमचा ईमेल तयार करा. ‘पाठवा’ वर क्लिक केल्यानंतर, स्क्रीनच्या तळाशी एक संदेश दिसेल, जो तुम्हाला निवडलेल्या वेळेत पाठवलेला ईमेल ‘Undo’ करण्याची परवानगी देईल. ईमेल रद्द करणे केवळं तुमच्या ईमेलमधील चुका सुधारण्यात मदत करत नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवते की, तुम्ही काही सेकंदात ईमेल Undo करू शकता आणि पुन्हा send करू शकता.