युट्यूब हे लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर अगदी बडबड गीतांपासून प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या व्याख्यानापर्यंत सर्वप्रकारचा कंटेन्ट उपलब्ध असतो. वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तींचा कंटेन्ट, व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध होतात. तसेच कंटेन्ट क्रिएटर्सना देखील त्यांच्या जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचता येते. एखादे गाणे आपल्याला आठवते किंवा एखादी ट्युन आपण नकळत गुणगुणतो आणि ते गाणे लगेच ऐकण्याची इच्छा होते, तेव्हा लगेच आपण युट्यूबवर ते सर्च करून पाहतो, ऐकतो. अशाचप्रकारे एखाद्या आवडत्या चित्रपटाचा सीन, नाटकामधील एखादे पात्र आठवते आणि आपण लगेच ते पुन्हा अनुभवण्यासाठी आपण युट्यूबचा आधार घेतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याला आवडणारा कंटेन्ट आपल्या मित्र मंडळींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर ही शेअर करावा असे आपल्याला अनेकदा वाटते. यासाठी व्हॉटसअ‍ॅप स्टेटस हा पर्याय आहे पण त्यावर युट्यूब व्हिडीओची फक्त लिंक शेअर करता येते. जर तुम्हाला युट्यूब शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी एक सोपी ट्रिक वापरता येते. याचा वापर करून तुम्ही युट्यूब शॉर्ट सहज व्हॉटसअ‍ॅप स्टेटसमध्ये ठेवू शकता. कशी वापरायची ही ट्रिक जाणून घ्या.

आणखी वाचा : एटीएमकार्डशिवाय वापरता येणार PhonePe UPI; आधारकार्डचा हा उपयोग तुम्हाला माहित आहे का?

युट्यूब शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • युट्यूब अ‍ॅप उघडून त्यातील जो शॉर्ट व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • त्यामधील शेअर पर्यायावर क्लिक करून कॉपी लिंक पर्याय निवडा.
  • त्यानंतर गूगलवर ‘Shortsnoob.com’ सर्च करा.
  • त्यामधील दिलेल्या पर्यायामध्ये कॉपी केलेला युआरएल पेस्ट करा.
  • त्यानंतर डाऊनलोड पर्यावर क्लिक करा. फोनमध्ये तो व्हिडिओ डाऊनलोड होईल.
  • Shortsnoob.com चे अ‍ॅप देखील उपलब्ध आहे.
  • अँड्रॉइड युजर्स या पद्धतीचा वापर करू शकतात.
  • आयफोन युजर्स ytshorts.savetube.me या वेबसाईटवरून वरील स्टेप्स वापरून युट्यूब शॉट व्हिडिओ डाऊनलोड करू शकतात.

आणखी वाचा : कोणत्याही अ‍ॅपशिवाय QR Code स्कॅन करता येणार; फक्त वापरा ही सोपी ट्रिक

यानंतर फोन गॅलरीमधून किंवा फोन मधील फाइल्स > डाउनलोड या पर्यायामध्ये जाऊन युट्यूब शॉट व्हिडिओ तुम्ही व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर सहज अपलोड करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to upload youtube short video on whatsapp status know easy steps of downloading pns