Google Multisearch Feature : गुगल फॉर इंडिया इव्हेंट २०२२ मध्ये गुगलने काही नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. सर्च करणे युजरला सोयीचे व्हावे या उद्धेशाने गुगलने सर्चसंबंधी काही मनोरंजक वैशिष्ट्ये सादर केली आहेत. यातील मल्टीसर्च फीचर लक्षवेधक ठरले.
मल्टीसर्च फीचरद्वारे युजरला फोटो किंवा स्क्रीनशॉट्सच्या सहायाने गुगल सर्चवर काहीही सर्च करता येईल. या फीचरचा वापर करून काहीही शोधण्यासाठी युजरला कॅमेरा आयकॉनचा वापर करून फोटो काढावा लागेल किंवा फोटोगॅलरीतून फोटो अपलोड करावा लागेल किंवा केवळ स्क्रीनशॉट अॅड करावे लागले.
फोटो अपलोड झाल्यावर गुगल सर्च त्यासंबंधी सर्च दाखवेल. उदाहरणार्थ, तुम्ही टीशर्टचा फोटो काढून तो अॅड केल्यावर गुगल समान फॅब्रिक, डिजाईन आणि पॅटर्नचे कपडे शोधेल. हे काम गुगल लेन्सचा वापर करूनही होऊ शकते, परंतु मल्टीसर्च पर्यायाद्वारे युजरला अतिशय विशिष्ट गोष्टी शोधता येतील. उदाहरणार्थ तुम्ही अपलोड केलेल्या फोटोमध्ये ज्या फॅब्रिकसह टीशर्ट दिसते, त्याच फॅब्रिकसह तसेच टीशर्ट तुम्हाला हवे असल्यास त्यासाठी तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात त्याविषयी लिहावे लागेल आणि गुगल त्यासंबंधी सर्च तुम्हाला दाखवेल.
Multisearch feature आधीच भारतात उपलब्ध आहे. आणि पहिले हिंदीसह नंतर इतर भाषेमध्ये ते उपलब्ध करणार असल्याची पुष्टी गुगलने केली आहे. या फीचरद्वारे युजरला फोटो आणि टेक्स्ट वापरून ते नेमकं जे शोधत आहेत ते सापडण्यास मदत होईल. हे फीचर कसे वापरायाचे जाणून घ्या.
- गुगल अॅप सुरू करा.
- सर्चबारवर क्लिक करा. नंतर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा.
- तुम्ही एकतर फोटो क्लिक करू शकता किंवा गॅलरीमधून स्क्रिनशॉट्स जोडू शकता.
- गुगल आता त्यासंबंधी सर्च परिणाम दाखवेल.
- मल्टीसर्च फीचर वापरण्यासाठी स्क्रीन स्वाइप अप करा आणि ‘अॅड टू यूअर सर्च’ बारमध्ये टेक्स्ट टाका. गुगल तुमच्या आवश्यकतेनुसार विशिष्ट परिणाम दाखवेल.