अलिकडे व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी अनेक फीचर सादर करत आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच कम्युनिटी फीचर लाँच केले आहे, ज्यामुळे एकाच छताखाली अनेक ग्रुप एकत्र येऊन संपर्कात राहू शकतात, तर ग्रुपमधील सदस्य संख्या वाढवून ती १ हजारावर करण्यात आली आहे. यामुळे एका ग्रुपमध्ये अनेक सदस्यांचा समावेश शक्य झाला आहे. आता व्हॉट्सअॅपने अजून एक सेवा सादर केली आहे. याद्वारे एक खाते एकापेक्षा अधिक स्मार्टफोनवर चालवता येईल.
जीएसएम अरिनाच्या अहवालानुसार, नवीन बडी मोड युजरला त्याचा प्राथमिक खात्याला दुसरे मोबाइल जोडण्यासाठी मदत करते. अँड्रॉइडसाठीच्या व्हॉट्सअॅप बिटा व्हर्जन २.२२.२४.१८ मध्ये या मोडचा समावेश करण्यात आला आहे.
(ग्राहकाला मिळाला न्याय! ‘ZOMATO’ला ८ हजार ३६२ रुपयांच्या भरपाईचे आदेश)
अहवालानुसार, बिटा युजर आता कम्पॅनियन मोड अॅक्टिव्हेट करू शकतात. यासाठी रजिस्ट्रेशन स्क्रिनवरील सेटिंग मेन्यू अंतर्गत ड्रॉपडाऊन मेन्यूमधील ‘लिंक ए डिव्हाइस’ हे पर्याय निवडावे लागेल. आतापर्यंत केवळ मर्यादित संख्येत बिटा वापरकर्ते हे फीचर वापरत आहे. लवकरच हे फीचर इतरांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
बिटा व्हर्जन वापरकर्त्यांनी दोन फोनवर एक खाते वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करावे.
प्रायमरी फोनसाठी
- प्रायमरी फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करा.
- थ्री डॉटेड आयकनवर क्लिक करा.
- ‘लिंक्ड डिव्हाइसेस’ पर्यायावर टॅप करा.
- त्यानंतर ‘लिंक्ड ए डिव्हाइस’ पर्यायावर क्लिक करा याने डिस्प्लेवर क्युआरकोड दिसेल.
सेकंडरी फोन
- बिटा प्रोग्रामसाठी साइन अप केल्यानंतर सेकंडरी फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडा आणि लॉग इन करा.
- त्यानंतर थ्री डॉटेड मेन्यूवर क्लिक करा. ‘लिंक ए डिव्हाइस’ पर्यायावर टॅप करा.
- आता प्रायमरी फोनमधील क्युआर कोड स्कॅन करा.