एखादी महत्त्वाची फाइल, तर कार्यक्रमातील कॅमेरात काढलेले फोटो, तर जास्त एमबीचे व्हिडीओ कसे शेअर करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. स्मार्टफोनमध्ये फाइल्स शेअर करण्यासाठी ब्ल्यूटूथ हा पर्याय असतो, पण ब्ल्यूटूथवरून फाइल्स शेअर करणे कठीण जाते आणि मोठ्या फाइल्स शेअर होण्यास अधिक वेळही लागतो; तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण क्विक शेअरच्या मदतीने तुम्ही सहज फाइल्स शेअर करू शकणार आहात.

वर्षाच्या सुरुवातीला, गूगलने आपल्या ‘निअर बाय शेअर’ (Nearby Share) फीचरचे नाव बदलून ‘क्विक शेअर’ (Quick Share) केलं आहे. हे फीचर विंडोज, क्रोमओएस आणि ॲण्ड्रॉइड उपकरणांवर उपलब्ध आहे. हे फीचर वापरकर्त्यांना फोन, डेस्कटॉप, टॅबलेटमधून फोटो, व्हिडीओ, फाइल्स झटपट शेअर करण्यात मदत करते. तसेच खास गोष्ट अशी की, हे फीचर इंटरनेटशिवाय कार्य करते; त्यामुळे मोबाइल डेटा संपेल याचीसुद्धा वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

तुमच्या ॲण्ड्रॉइड डिव्हाइसवर क्विक शेअर शोधण्यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर स्क्रोल करा किंवा सर्च बारमध्ये ‘क्विक शेअर’ टाईप करून सर्च करा, तुम्हाला हे फीचर दिसून येईल. क्विक शेअरच्या मदतीने मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यांना फोटो, व्हिडीओ किंवा फाइल्स पाठवण्यासाठी तुम्ही पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

हेही वाचा…आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…

ॲण्ड्रॉइड डिव्हाइसवर क्विक शेअर कसे वापरायचे ते पाहू…

१. क्विक शेअर वापरून फाइल्स पाठवण्यासाठी तुम्हाला जो फोटो, फाइल किंवा लिंक इतरांना पाठवायची आहे ती ओपन करा, त्यानंतर ‘शेअर ‘बटणावर क्लिक करा.

२. आता ‘क्विक शेअर’ या पर्यायावर टॅप करा, तेव्हा तुम्हाला जवळपासच्या डिव्हाइजची यादी दिसेल.

३. जर तुम्हाला जवळपासच्या पर्यायांची यादी दिसत नसेल तर उजवीकडे असणाऱ्या तीन-डॉट मेनूवर टॅप करा आणि ‘सेटिंग्ज’वर क्लिक करा.

४. आता, ‘Who can share with you’वर टॅप करा आणि ‘व्हिजीबल निअर बाय डिव्हाइज’ पर्याय चालू (ऑन) करा. यानंतर आपला फोन जवळच्या डिव्हाइसचा शोध सुरू करेल.

५. तुम्हाला कोणत्या डिव्हाइसवर तुमचे फोटो, व्हिडीओ, फाइल शेअर करायचे आहेत, त्या नावावर क्लिक करा.

६. त्यानंतर फोटो, व्हिडीओ प्राप्तकर्त्याला (receiver) त्यांच्या डिव्हाइसवर फाइल प्राप्त करण्याची एक सूचना दिली जाईल आणि काही वेळातच फाइल ट्रान्सफर होईल. तर अशाप्रकारे तुम्ही काही मिनिटांत इतरांच्या डिव्हाइसवर फाईल्स ट्रान्सफर करू शकता.