आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमचा पर्याय येतो. म्हणजेच युजर्सना फोनमध्ये दोन सिम ठेवण्याची संधी मिळते. बहुतेक युजर्स दोन सिमही टाकतात. काही वापरकर्त्यांकडे ज्याप्रकारे दोन मोबाईल नंबर असतात, तसेच त्यांच्याकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामचे ड्युअल अकाउंट्स असतात. परंतु एकाच फोनमध्ये ही दोन अकाउंट्स कशी वापरायची हे बहुतेक युजर्सना माहित नसते.
लोकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी आता अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी फोनमध्ये अशा अॅप्ससाठी इनबिल्ट ड्युअल स्पेस देण्यास सुरुवात केली आहे. काही वापरकर्त्यांना याची जाणीव आहे. आज आपण काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही या फीचर्सचा वापर करू शकता.
रखरखत्या उन्हात तुमचा जुना कुलर देतोय गरम हवा? ‘या’ तीन टिप्सचा वापर केल्यावर मिळेल एसीसारखी कुलिंग
आता अनेक स्मार्टफोन्समध्ये क्लोन अॅप नावाची डिफॉल्ट सेटिंग असते, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचे ड्युअल अकाउंट्स चालवू शकता. सध्या, हे वैशिष्ट्य शाओमी (Xiaomi), सॅमसंग (Samsung), विवो (Vivo), ओप्पो (Oppo), Huawei आणि ऑनर (Honor) सारख्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. आता आपण क्लोन अॅप सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- जर तुमच्याकडे वर नमूद केलेल्या कंपनीचा फोन असेल तर सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
- यानंतर ड्युअल अॅप किंवा क्लोन अॅपच्या पर्यायावर जा. यानंतर या पर्यायावर त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम अॅपचा पर्याय दिसेल.
- तुम्हाला यापैकी जे क्लोन करायचे आहे त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या फोनमध्ये त्या अॅपचा क्लोन तयार होईल. ज्यावर २ क्रमांक लिहिलेला असेल.
- आता तुम्ही ते अॅप उघडा आणि दुसर्या खात्याने लॉग इन करा.
Photos : AC, Cooler चालवल्यावरही वीजेचे बिल येणार कमी; फॉलो करा ‘या’ खास टिप्स
जर हे फीचर फोनमध्ये नसेल तर ही ट्रिक फॉलो करा
क्लोन अॅप किंवा ड्युअल अॅप प्रत्येक फोनमध्ये असेलच असे नाही. हे कंपनीच्या काही मॉडेल्सपुरतेही मर्यादित असू शकते. तुमच्या फोनमध्ये ड्युअल अॅप किंवा क्लोन अॅपची डिफॉल्ट सुविधा नसली तरीही तुम्ही दोन अॅप्स चालवू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप वापरावे लागेल. ड्युअल अॅप वापरण्यासाठी, तुमच्याकडे ड्युअल अॅप व्हिझार्ड, पॅरालेल आणि ड्युअल अॅप (DoubleApp) सारखे पर्याय आहेत. हे अॅप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. यानंतर, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दुसरे खाते चालवायचे आहे त्यावर क्लिक करा आणि लॉग इन करा.