How To Use Undo Device Backup Features : लग्न समारंभ, सहल, वाढदिवस किंवा एखादा सण असेल, तर आपण मोबाईल, कॅमेऱ्यामध्ये अनेक फोटो काढतो. कार्यक्रमातील आनंदी क्षण या फोटोंमध्ये कैद होतात. पण, अनेकदा असं होतं की, काही कारणास्तव आपल्याकडून हे फोटो डिलीट (Delete) होतात. पण, गूगल फोटोज ही एक अशी लोकप्रिय ऑनलाइन सेवा आहे, जी तुम्हाला फोटो, व्हिडीओ स्टोअर, एडिट, ऑर्गनाइज, सुरक्षित ठेवण्यात आणि शेअर करण्यास मदत करते. या मीडिया फाइल्स क्लाउडवर सेव्ह केल्यामुळे त्या कोणत्याही डिव्हाइसवरून सहज अ‍ॅक्सेस करता येतात, मग स्मार्ट फोन असो किंवा स्मार्ट टीव्ही. तर, आता गूगल फोटोजमध्ये ‘अनडू डिव्हाइस बॅकअप’ (Undo device backup) नावाचे एक नवीन फीचर येत आहे.

या फीचरने युजर्स त्यांच्या Google Photos मधून फोटो आणि व्हिडीओ हटवू शकतात. पण, ते तुमच्या फोनवरच राहतील.मात्र, एकदा तुम्ही तुमचा गूगल फोटोज बॅकअप डिलीट केला की, त्या डिव्हाइसवरील बॅकअप आपोआप बंद होईल, असं गूगलचं म्हणणं आहे.

iOS डिव्हायसेसवर उपलब्ध असलेली ही कार्यक्षमता युजर्सना त्यांच्या डिव्हाइसवरून बॅकअप घेताना, त्या डिव्हाइसवरून ते फोटो, व्हिडीओज डिलीट न करता गूगल फोटोजमधून फोटो, व्हिडीओ काढून टाकण्याची परवानगी देण्यात येते. तसेच, क्लाउड बॅकअप डिलीट झाल्यावर, गूगल फोटोज बॅकअप फीचर त्या डिव्हाइससाठी ऑटोमॅटिकली डिसेबल केले जाईल.

‘अनडू डिव्हाइस बॅकअप’ फीचर कसे काम करते?

  • अँड्रॉइड डिव्हाइसवरील गूगल फोटोजमधील तुम्हाला बॅकअप डिलीट करायचा आहे. त्यासाठी गूगल फोटोजवरील वरच्या उजवीकडे तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • आता ‘फोटो सेटिंग्ज’वर टॅप करा. बॅकअप विभागात जा आणि ‘या डिव्हाइससाठी बॅकअप रद्द करा’ (Undo backup for this device) नावाचा पर्याय शोधण्यासाठी थोडे खाली स्क्रोल करा.
  • ‘I understand my photos and videos from this device will be deleted from Google Photos’ या पुढील टिक बॉक्सवर टॅप करा आणि ‘डिलीट गूगल फोटोज बॅकअप’वर क्लिक करा.
  • येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, गूगल अजूनही हा नवीन पर्याय सर्वांसाठी आणत असेल. त्यामुळे तुमच्या खात्यावर किंवा डिव्हाइसवर तो उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते.
  • मागील पद्धतीच्या तुलनेत, ज्यामध्ये डिव्हाइससाठी बॅकअप बंद करणे आणि फोटो आणि व्हिडीओ हटविण्यासाठी गूगल फोटोज वेबसाइटवर जाणे समाविष्ट होते. पण, नवीन पर्याय तुलनेने सोपा व त्रासमुक्त आहे.

Story img Loader