व्हॉटसअॅपवर नवे अवतार फीचर रोल आऊट करण्यात आले आहे. या फीचरचा वापर करून युजर्सना ईमोजीप्रमाणे अवतार शेअर करता येणार आहे. हे फीचर म्हणजे तुमचे स्वरूप शेअर करता येण्याची संधी आहे. तुम्हाला एखादा मेसेज पाहून काय वाटले यासाठी ‘अवतार’ शेअर करून व्यक्त होऊ शकता. याआधी हे फीचर फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते, आता हे व्हॉटसअॅपवरही उपलब्ध झाले आहे. हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अवतार फीचर सेट करण्यासाठी वापरा या स्टेप्स
आणखी वाचा: व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या
- व्हॉटसअॅप उघडून त्यामध्ये स्टिकर्स पर्याय निवडा.
- आयफोनमध्ये हा पर्याय चॅटबॉक्सवरच उपलब्ध असेल.
- अँड्रॉइडमध्ये इमोजी आयकॉनवर क्लिक करा. त्यामध्ये सर्वात खाली जीआयएफ पर्याया शेजारी तुम्हाला स्टीकर्स पर्याय दिसेल.
- जर तुम्ही पहिल्यांदा हा पर्याय निवडला तर तुम्हाला अवतार क्रिएट करावा लागेल, यासाठी ‘गेट स्टारटेड’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, डोळे, चेहरा यांची निवड करा.
- एकदा तुमच्या अवतार निवडुन झाल्यानंतर ‘डन’ पर्याय निवडा.
- व्हॉटसअॅपवर तुम्हाला फ्रंट कॅमेरा उघडून अवतार निवडण्यासाठी मदत करण्यात येते, तुम्हाला अवतार निवडण्यात अडचण येत असेल तर हा पर्याय वापरु शकता.
First published on: 08-12-2022 at 16:28 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use whatsapp avtar feature know easy steps pns