काही काळापासून मेटा आपल्या मेसेजिंग आणि व्हॉट्सॲपसारख्या अॅप्सची सुरक्षा वाढवण्याचे काम करीत आहे. त्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्सदेखील आणत आहे; परंतु अनेक वापरकर्त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. सगळ्यांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध असणाऱ्या या प्रायव्हसी पर्यायाबद्दल माहिती देण्यासाठी मेटाने काही काळापूर्वी प्रायव्हसी चेक नावाचे एक फीचर आणले होते. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कोण त्यांची माहिती पाहत आहे? यावर लक्ष ठेवता येणार असून, ती मॅनेजसुद्धा करता येईल, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळते.

व्हॉट्सॲपच्या अधिकृत ब्लॉग पोस्टनुसार व्हॉट्सॲपमधील ‘प्रायव्हसी चेक’ हे वापरकर्त्यांना ॲपमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रायव्हसी आणि सुरक्षा फीचर्सबद्दलची माहिती देते; ज्यामुळे वापरकर्ते सगळ्या सेटिंग तपासून, त्यांना हवे असतील तसे बदल करून घेऊ शकतात. त्यासोबतच वापरकर्ता कोणती माहिती शेअर करतोय किंवा त्याच्याकडे कोणती माहिती येत आहे, यावरही त्याला नियंत्रण ठेवता येणार आहे.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
india post payment bank scam
India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Senior citizen duped by cyber fraudster in pune
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक

हेही वाचा : तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतोय का? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? मग एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा…

या फीचरचा फायदा करून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रायव्हसी चेकअपमधील ‘स्टार्ट चेकअप’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर कोण तुम्हाला संपर्क करू शकतात, कोण तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकतात आणि ब्लॉक केलेल्या व्यक्तींना मॅनेज करणे यांसारख्या अनेक स्लाइड स्क्रीनवर येतील. त्यामध्ये तुम्हाला हवे असणारे पर्याय तुम्ही निवडा. त्यासोबतच इतर सेटिंग्स; जसे की, प्रोफाइल फोटो बदलणे, तुमची वैयक्तिक माहिती बदलणे, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस आणि रीड केल्याच्या टिक्स या सर्वांमध्ये अगदी सहज बदल करता येऊ शकतो. त्याव्यतिरिक्त तुम्हाला जर चॅट्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अधिक वाढवायची असेल, एण्ड टू एण्ड इन्क्रिप्टेड बॅकअप चालू करू शकता आणि डिसअॅपियरिंग मेसेजेस हा पर्याय निवडू शकता.

पाहा व्हॉट्सॲपवरील ‘ही’ खास फीचर्स कशी सुरू करायची ते…

१. अनोळखी व्यक्तींचे फोन कसे बंद करायचे?

आपले व्हॉट्सॲप चालू करा.
अकाउंटवर क्लिक करा
ब्लॉक्ड कॉन्टॅक्ट्सवर क्लिक करा
आता उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या अॅड या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनोळखी नंबर [अननोन] निवडा.
शेवटी ब्लॉक या पर्यायावर क्लिक करा.

२. स्क्रीन लॉक कसे चालू करावे?

व्हॉट्सॲप चालू करून, सेटिंग्समध्ये जावे.
अकाउंटमध्ये जाऊन प्रायव्हसी हा पर्याय निवडा
त्यामधील स्क्रीन लॉकवर क्लिक करा
फेस आयडी किंवा टच आयडी लावून घ्या
त्यासोबत व्हॉट्सॲप बंद केल्यानंतर किती वेळासाठी स्क्रीन लॉकची आवश्यकता आहे तेसुद्धा ठरवू शकता.

३. 2FA म्हणजेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन

व्हॉट्सॲप चालू करा.
अकाउंटवर क्लिक करून, टू स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा.
टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा.
सहा आकडी पिन भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
आता तुमचा ई-मेल अॅड्रेस भरून पुन्हा नेक्स्टवर क्लिक करा.
आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर व्हेरिफिकेशनचा मेल आला असेल.
त्यामधील कोड व्हॉट्सॲपमध्ये भरा आणि अजून एकदा नेक्स्ट हा पर्याय निवडा.

हेही वाचा : सॅमसंग स्मार्टफोन वापरताय? प्रायव्हसी अन् सुरक्षा वाढवण्यासाठी ‘या’ सेटिंगचा उपयोग करा, पाहा ही ट्रिक

या सर्व सुरक्षा सेटिंग्ससहित प्रायव्हसी चेकअपचे आणखी काही फीचर्सही उपलब्ध आहेत; ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटसाठी करू शकता.

१. तुमचा प्रोफाइल फोटो कोण कोण पाहू शकतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता.

२. ऑनलाइन किंवा लास्ट सीनसुद्धा तुम्ही बंद करून ठेवू शकता.

३. मेसेज वाचल्याच्या निळ्या खुणादेखील तुम्हाला बंद करता येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही चुकून एखादा मेसेज वाचलात, तर ते समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. परंतु, हा पर्याय ग्रुप चॅट्ससाठी लागू पडत नाही.

४. तुम्हाला कोण ग्रुपमध्ये अॅड करू शकतात यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येऊ शकते.

५. डिसअॅपियरिंग मेसेजेसमध्ये एखाद्या चॅटचे मेसेज तुम्ही ठरवलेल्या कालावधीनंतर आपोआप गायब होतात. या फीचरसाठी तुम्हाला २४ तास, ७ दिवस, ९० दिवस व १ वर्ष, असे पर्याय मिळतात.

६. एण्ड टू एण्ड इन्क्रिप्टेड बॅकअप चालू केल्यामुळे तुमच्या चॅटच्या बॅकअपवर केवळ तुमचे नियंत्रण असते.

७. ब्लॉक आणि गैरवर्तनाची तक्रार [Block and report abuse] या फीचरमध्ये तुम्हाला नंबर किंवा ग्रुप ब्लॉक करता येतो. त्यासोबतच एखाद्या गैरवर्तनाबद्दल तक्रारसुद्धा करता येते. त्यासाठी व्हॉट्सॲप उघडून, अकाउंटवर जाऊन प्रायव्हसी हा पर्याय निवडावा.

Story img Loader