iPhone 15 Launch Today: अॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. १२ सप्टेंबर म्हणजेच आज कंपनी आपली iPhone 15 सिरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले नवीन वॉच किंवा नवीन मॅकबुक तसेच एअरपॉड्स देखील लॉन्च करू शकते. मात्र आयफोन १५ सिरीज इव्हेंटचे मुख्य आकर्षण असणार आहे.
Apple कंपनी आज आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च करणार आहे. यामध्ये कंपनी चार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. त्यामध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश असणार आहे.
iphone 15 launch : कुठे आणि किती वाजता पाहता येणार लाइव्ह इव्हेंट
Apple कंपनीचा Wonderlust हा इव्हेंट आज रात्री १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. कंपनीचा हा लाइव्ह इव्हेंट तुम्हाला कंपनीची अधिकृत वेबसाइट, YouTube, आणि X (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येणार आहे. भारतातील नागरिक हा इव्हेंट रात्री १०.३० वाजल्यापासून पाहू शकणार आहेत.
अपेक्षित किंमत
बार्कलेजचे विशेलषक टीम लॉन्ग यांच्या मते लीक झालेल्या किंमतीनुसार आयफोन १५ आणि आयफोन १५प्लस ची किंमत जनरेशनमधील डिव्हाइसरखीच असेल. प्रो मॉडेल्ससाठी आयफोन १५ प्रो ची किंमत त्याच्या पूर्वीच्या डिव्हाइसपेक्षा $१०० जास्त असू शकते. त्याचप्रमाणे आयफोन १५ प्रो मॅक्स ची किंमत $२०० ने वाढण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे आयफोन १४ प्रो १,२९,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. तर आयफोन १४ प्रो मॅक्स १,३९,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, आयफोन १५ सीरिजला सध्याच्या आयफोन १४ प्रमाणेच मागणी असेल. टेक जायंट यावर्षी आयफोन १५ सिरीजमधील ८५ दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
Apple Hub (Tim Long from Barclays चा हवाला ) देऊन आयफोन १५ ची किंमत $७९९ (अंदाजे ६५,७०० रुपये) या किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत $८९९ (अंदाजे ७३,९००), आयफोन १५ प्रो ची किंमत $१,०९९ (अंदाजे ९०,१००) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि iPhone 15 Pro Max ची किंमत $१,२९९ (अंदाजे १,०६,५०० रुपये ) असण्याची शक्यता आहे.
अशी अपेक्षा आहे की या iPhone 15 मॉडेल्सच्या किंमतीमध्ये भारतात देखील अशी वाढ बघायला मिळेल.