September 2023 Apple Event: Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे.  अ‍ॅपल कंपनीने त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. ज्यात अनेक प्रॉडक्ट्स सादर १२ सप्टेंबर म्हणजे उद्या कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले असून तसेच निळ्या आणि सोनेरी रंगामध्ये Apple चा लोगो देखील त्यात दिसत आहे. कंपनीने दिलेल्या आमंत्रणामध्ये कोणती प्रॉडक्ट्स लॉन्च होतील हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपलच्या आगामी इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीज लॉन्च होईल. ज्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल, डिझाइन, कलरबद्दल आधी अनेक अफवा समोर येत आहेत. कंपनीद्वारे आयफोन १५ सह डिझाइनमध्ये काही मोठे बदल करणे अपेक्षित आहे. ज्यात USB-C पोर्टचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच iPhone 15 Ultra चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, किंमत…, एकदा पाहाच

दरम्यान, कंपनी इव्हेंटमध्ये दोन नवीन स्मार्टवॉच Apple वॉच सिरीज ९ आणि वॉच अल्ट्रा २ लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. वॉच सिरीज ९ हे पाच रंगांमध्ये लॉन्च केले जाईल अशी शक्यता आहे. डिझाइनच्या बाबतीत हे स्मार्टवॉच अधिसारखेच असण्याची अपेक्षा आहे. कंपनीने आपल्या आगामी Wonderlust इव्हेंटमध्ये लॉन्च किंवा सादर केल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्सबद्दल पुष्टी केलेली नाही आहे. तथापि, Apple विश्लेषक मार्क गुरमन यांनी या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्याबद्दल पुष्टी केली आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह इव्हेंट ?

अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. ज्यात अनेक प्रॉडक्ट्स सादर १२ सप्टेंबर रोजी कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले आहे. हा इव्हेंट १२ सप्टेंबर रोजी Apple पार्कमध्ये सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री १०. ३०) सुरू होणार आहे. कंपनीचा हा इव्हेंट apple.com आणि Apple TV अ‍ॅपवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. हा इव्हेंट उत्तमही या दोन ठिकाणी पाहू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to watch apple wonderlust event iphone 15 series launch 12 september check details tmb 01