Samsung ही एक टेक कंपनी आहे. कंपनी अनेक प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च करत असते. सॅमसंग कंपनी एक दक्षिण कोरियन कंपनी आहे. सॅमसंगचा एक इव्हेंट होणार आहे त्याबद्दल कंपनीने काही माहिती दिली आहे. सॅमसंगचा unpacked इव्हेंट हा उद्या म्हणजे २६ जुलै रोजी होणार आहे. हा इव्हेंट कुठे आणि कधी लाइव्ह पाहता येईल तसेच या कोणकोणते गॅजेट्स लॉन्च होऊ शकतात याबद्दल जाऊन घेऊयात.
हा इव्हेंट या वर्षातील दुसरा Galaxy Unpacked इव्हेंट आहे. जिथे सॅमसंग कंपनी प्रामुख्याने Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 वर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच कंपनी Galaxy Tab S9 सिरीज , Galaxy Watch 6 सिरीज आणि नवीन Galaxy Buds देखील सादर करेल. तसेच गॅलॅक्सी unpacked इव्हेंटमध्ये आपल्या पहिल्या स्मार्ट रिंगची घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
आगामी Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 हे दोन्ही फोल्डेबल फोन्स आधीच्या फोनपेक्षा वजनाने हलके आणि स्लिम असतील हे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, Galaxy Z Flip 5 मध्ये त्याच्या पूर्वीपेक्षा तुलनेत खूप मोठा कव्हर डिस्प्ले मिळू शकतो. तसेच सॅमसंगने आतापर्यंत सर्वात स्लिम फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 5 हा आहे.
कधी आहे कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट?
सॅमसंगचा Unpacked इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि YouTube वर लाइव्ह-स्ट्रीम केला जाणार आहे. तसेच भारतीय वेळेनुसार याचे सादरीकरण संध्याकाळी ४.३० PM वाजता सुरू होणार आहे. जिथे सॅमसंग फोल्डेबल डिव्हाइस, टॅबलेट आणि wearables सह आपल्या नवीन गॅजेट्सचे अनावरण करेल.