प्रत्येक जण हल्ली स्मार्टफोन वापरतो. आपली बरीचशी कामे आता स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होतात. आपण जेव्हा स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी त्यात आहेत की नाही ते पाहून करत असतो. मात्र जेव्हा आपल्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असतो आणि आपण नवीन आयफोन खरेदी करतो. जेव्हा आपण आयफोन खरेदी करतो तेव्हा अँड्रॉइड फोनमधून आयफोनमध्ये डेटा ट्रान्सफर करणे हे महत्वाचे असते. व्हॉट्सअॅप चॅट्स ट्रान्सफर करणे हा यामधील एक महत्वाचा भाग असतो. iOS वरून iOS वर डेटा ट्रान्सफर करणे सोपे असते. मात्र अँड्रॉइड डिव्हाइसवरून iOS डिव्हाइसवर चॅट्स ट्रान्सफर करणे इतके सोपे नसते. तर आज आपण अँड्रॉइड डिव्हाइसवरून iOS डिव्हाइसमध्ये कशाप्रकारे व्हॉट्सअॅप चॅट्स ट्रान्सफर करता येते , त्याबद्दल जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅप डेटा ज्यामध्ये प्रोफाइल फोटो. चॅट्स, ग्रुप चॅट, चॅट हिस्ट्री, मिडिया आणि सेटिंग्सचा समावेश आहे. तसेच अँड्रॉइड डिव्हाइसमधून व्हॉट्सअॅप डेटा आयफोनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठीसर्वात प्रथम तुम्हाला Move to iOS नावाचे एक अॅप डाउनलोड करावे लागेल. तुमचे व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करण्यासाठी तुमचा आयफोन एकतर नवीन आहे किंवा रिसेट केलेला आहे याची खात्री करावी लागेल. तसेच अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइस चार्जिंग लावलेले असले याची देखील खात्री करावी. तसेच वायफाय कनेक्ट केलेले आहे किंवा अँड्रॉइड डिव्हाइस आयफोनच्या हॉटस्पॉटने केन्क्ट केले आहे का हे देखील तपासावे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
व्हॉट्सअॅप चॅट्स अँड्रॉइडवरून आयफोनवर कसे ट्रान्सफर करायचे?
१. तुमच्या अँड्रॉइड फोनवर Move to iOS नावाचे एक अॅप डाउनलोड करावे.
२. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
३. त्यानंतर तुम्हाला कोड विचारला गेल्यास तुमच्या आयफोनवर कोड प्रविष्ट करावा.
४. Continue बटणावर क्लिक करावे. त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
५. ट्रान्सफर डेटा स्क्रीनवर व्हॉट्सअॅपवर क्लिक करावे.
६. अँड्रॉइड स्मार्टफोनवर Get started वर क्लिक करावे आणि व्हॉट्सअॅपकडून डेटा ट्रान्सफर होण्याची वाट पहावी.
७. त्यानंतर Move to iOS अॅपवर परत जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करावे.
८. आता आयफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करावे आणि तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून लॉग इन करावे.
९. स्टार्टवर क्लिक करावे आणि डेटा ट्रान्सफर होईपर्यंत प्रतीक्षा करावी.
१०. एकदा का डेटा ट्रान्सफर झाला की तुम्ही तुमचे सर्व चॅट्स आणि अन्य डेटा आयफोनवर पाहू शकणार आहात.