सध्याचा जमाना डिजीटल आहे, त्यामुळे आपणाला सतत इंटरनेटची गरज भासते. मात्र, अनेकवेळा आपल्या घरात किंवा कामाच्या ठीकाणी मोबाईलमध्ये नेटवर्कची समस्या जाणवते. अशावेळी आपणाला एखादा महत्त्वाचा कॉल करायचा किंवा सोशल मीडियावर काही पाहायचं असल्यास अनेक वेळ नेटवर्कची समस्या निर्माण होते. अशावेळी ऑनलाईन चॅटिंग करण्यातही अडथळा येतो त्यामुळे अनेकांची चिडचिड होते.
आजकाल प्रत्येक घराघरात मोबाईल पोहोचला आहे. दूरसंचार कंपन्यामध्येतर वेगवान इंटरनेट स्पीड आणि नेटवर्क सुविधा देण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. मात्र, आजही अनेकांना अशी समस्या असते की, त्यांच्या घरात किंवा विशिष्ट भागात सिग्नल मिळत नाही. मात्र आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क मिळत नाही याला प्रत्येकवेळी टेलिकॉम कंपनीच जबाबदार असते असं नाही.
हेही पाहा- मोबाईलची पण Expiry Date असते? तो किती वर्षापर्यंत वापरता येतो? जाणून घ्या
कारण, बरेच लोक त्यांच्या घरात किंवा दुकानात ‘सिग्नल बूस्टर’ लावतात, ज्यामुळे आसपासच्या लोकांना चांगलं नेटवर्क मिळत नाही. जर तुमच्याही घरी ही समस्या उद्भवत असेल, तर तुमच्या घराच्याशेजारी कोणीतरी ‘सिग्नल बूस्टर’ बसवले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला कमी नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. सिग्नल बूस्टर म्हणजे काय आणि ते कसं काम करतं याबाबतची माहिती जाणून घेऊया.
सिग्नल बूस्टर –
हेही वाचा- ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार
ग्रामीण भागात अनेकदा नेटवर्कची समस्या उद्भवते म्हणून अनेक लोक त्यांच्या सोयीसाठी असे सिग्नल बूस्टर बसवतात. हे बूस्टर मोबाईल नेटवर्क पकडण्यात मदत करतात. हे बुस्टर बसवल्यास व्हॉईस ब्रेक किंवा कॉल ड्रॉपच्या समस्यांपासून सुटका होते. परंतु असे बूस्टर लावणे बेकायदेशीर आहे. ते लावण्याची परवानगी दूरसंचार ऑपरेटर्सकडून किंवा दूरसंचार विभागाकडूनही देण्यात येत नाही. बूस्टर मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटचे स्पीड वाढवते. बूस्टरसह दोन प्रकारचे अँटेना वापरले जातात, त्यापैकी एक छतावर बसविला जातो तर दुसरा घरात बसविला जातो. बूस्टर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये व्यत्यय आणतात.
कंपनीकडून फ्री इंस्टॉल केला जातो –
हेही वाचा- मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण
बूस्टर विकणाऱ्या कंपन्या ते विनामूल्य इंस्टॉल करुन देतात. बूस्टर खरेदी केल्यानंतर त्या कंपनीतील इंजिनिअर घरी जाऊन तो इंस्टॉल करुन देतात. ते घरात अडॅप्टरद्वारे तर छतावर अँटेनाला वायरद्वारे जोडले जातात. दिल्लीतील अनेक कंपन्या बूस्टर विकण्याचे काम करतात मात्र, ते बसवणे बेकायदेशीर आहे. बूस्टर काढण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी मोहीमगी राबवण्यात येते.