कोणताही फॉर्म भरणे असो किंवा एंट्रीवर आपल्या ओळखीचा पुरावा देणे असो, आपण सर्व वापरत असलेले एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड. आधार कार्ड बनवणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे आणि ते सर्वत्र उपयुक्त देखील आहे. पण कधी-कधी तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर काही काम घरून केले जाऊ शकते पण बहुतेक कामे करण्यासाठी एक लांब प्रक्रिया असते.
युआयडीएआयने घोषणा केली आहे की, येत्या काळात ते अशी सेवा सुरू करणार आहेत ज्यामुळे आधार कार्ड वापरकर्ते घरबसल्या त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही. सर्व आधार कार्ड वापरकर्ते आता घरबसल्याच कार्डमध्ये छोटे-मोठे बदल करू शकणार आहेत.
Google तुमचे बोलणे चोरून तर ऐकत नाही ना? जाणून घ्या का दिसतात आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या जाहिराती
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की युआयडीएआय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुमारे ४८ हजार पोस्टमनला प्रशिक्षण देत आहे. हे पोस्टमन प्रशिक्षणानंतर देशभरात डोअरस्टेप आधार सेवा करू शकतील. म्हणजेच येत्या काळात पोस्टमन तुमच्या घरापर्यंत पत्रे आणि पार्सल पोहोचवतील तसेच आधार कार्डशी संबंधित सेवाही देतील. असे सांगितले जाते की हे पोस्टमन डिजिटल उपकरणे म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घेऊन येतील जेणेकरून ते आवश्यक अपडेट त्वरित करू शकतील.
पुरुष Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात? संशोधनातून झाले अनेक रंजक खुलासे
डोअरस्टेप आधार सेवेमध्ये फोन नंबर आधार कार्डशी लिंक करणे, चित्र किंवा पत्ता बदलणे इत्यादी सेवांचा समावेश असेल. ही सेवा सुरू करण्याच्या पहिल्या टप्प्यात पोस्टमन देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे दीड लाख टपाल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.