Apple Microsoft & Amazon Event in September 2023: टेक्नॉलॉजीसाठी दरवर्षी सप्टेंबर हा महिना नेहमीच रोमांचक राहिला आहे. या महिन्यात Apple आपल्या नवीन आयफोन सीरिजचे अनावरण करत असतो. मात्र हे वर्ष थोडे वेगळे आहे. कारण यावेळी अनेक टेक कंपन्या आपले नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यंदाचा सप्टेंबर महिना टेक क्षेत्रासाठी कसा महत्वही ठरणार आहे आणि या महिन्यात कोणकोणते प्रॉडक्ट्स लॉन्च होऊ शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

IFA 2023

जगातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंचा ट्रेड शो पैकी एक असणारा इंटरनॅशनल फंकॉसस्टेलुंग (IFA) 2023 सप्टेंबर महिन्यात होणार आहे. हा इव्हेंट १ ते ५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी
Best Horror Movies On OTT
२०२४ मधील सर्वोत्तम भयपटांची यादी, सर्वच चित्रपट OTT वर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिलेत का?

हेही वाचा : रिलायन्स जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय मोफत JioSaavn Pro चे सबस्क्रिप्शन, ४२ जीबी डेटासह मिळणार…

Honor’s Unfold Tomorrow इव्हेंट: Honor’s कंपनी या इव्हेंटमध्ये कदाचित आपला एक फोल्डेबल किंवा फ्लिप स्मार्टफोन लॉन्च करू शकते. तसेच मॅजिक V2 चे देखील जागतिक स्तरावर लॉन्चिंग करू शकते.

सॅमसंग मॉनिटर्स आणि टीव्ही: सॅमसंग ही एक मोठी कोरियन टेक कंपनी आहे. कंपनीने नकुटेच आपले फोल्डेबल फोन्स आणि टॅबलेट लॉन्च केले आहेत. कदाचित IFA मध्ये कंपनी आणखी काही नवीन गॅजेट्स लॉन्च करू शकते.

सोनी किनोट इव्हेंट: जपानी ब्रँड असलेली सोनी कंपनी त्यांचे नवीन कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप Xperia 5 V किंवा इतर प्रॉडक्ट्सची घोषणा या इव्हेंटमध्ये करू शकते.

LG’s टेक्नॉलॉजी: सॅमसंग कंपनी या इव्हेंटमध्ये पर्यावरणपूरक प्रॉडक्ट्सवर तसेच काही नाविन्यपूर्ण आणि काही स्मार्ट गृहोपयोगी प्रॉडक्ट्सवर आपले लक्ष केंद्रित करेल.

Asus नोटबुक्स: Asus ही मूळ तैवानमधील टेक कंपनी आहे. कंपनी IFA इव्हेंटमध्ये Zenbook 17 Fold एलईडी किंवा इतर लॅपटॉप्स लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Apple चा सप्टेंबरमधील इव्हेंट: कंपनीच्या सप्टेंबरमधील इव्हेंट दरवर्षी होत असतो. यावेळी कंपनी नवीन आयफोन सिरीज किंवा वॉच मॉडेल रिलीज करत असते.अ‍ॅपल २०२३ सप्टेंबरमध्ये आपली आयफोन १५ सिरीज आणि वॉच सिरीज ९ लॉन्च करण्याची शक्यता आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा, एक यूएसबी सी पोर्ट आणि एक शक्तिशाली A17 बायोनिक चिप असू शकते.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: ‘रक्षाबंधन’ निमित्त बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट गॅजेट्स

Amazon : २८ सप्टेंबर २०२३ रोजी हार्डवेअर इव्हेंटचे आयोजन करणार असल्याचे Amazon ने सांगितले आहे. इतिहासात पहिल्यांदा कंपनीद्वारे केलेल्या कोणत्यातरी इव्हेंटची ही सर्वात पहिली घोषणा आहे. २०२२ मध्ये कंपनीने फायर टीव्ही क्यूब, फायर टीव्ही प्रो रिमोट, इको डिव्हाइसेस आणि किंडल स्क्राइब यासारख्या नवीन प्रॉडक्ट्सचे लॉन्चिंग केले होते.

Story img Loader