IIM संबळपूर मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अवनी मल्होत्रा हिने नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. अवनी मल्होत्रा हिला प्लेसमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल ६४.६१ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आयआयएम संबळपूरने केलेल्या ट्विटनुसार हा या वर्षातील सर्वात जास्त पगार आहे.” तसेच या प्लेसमेंटमध्ये मिळालेल्या ऑफरमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पगारामध्ये १४६.७ टक्य्यांनी वाढ झाली आहे.
अवनी मल्होत्राने तिच्या कॉलेज प्लेसमेंट दरम्यान मायक्रोसॉफ्टने घेतलेल्या मुलाखतीच्या ५ ते ६ फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या. अवनीला तिच्याकडे असलेल्या मॅनेजमेंट स्किल्स आणि इन्फोसिस कंपनीत असणारा तीन वर्षाचा अनुभव या सर्व निकषांवर तिला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.
अवनी मल्होत्रा हिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. यामुळे तिला मायक्रोसॉफ्ट टीमला प्रभावित करण्यास मदत मिळाली. अवनी मल्होत्रा म्हणाली की, या खडतर प्रवासात मला प्रशिक्षण देणाऱ्या आयआयएम संबळपूर आणि प्राध्यापकांची मी मनापासून आभारी आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या पालकांना देऊ इच्छितो. माझ्या आईने शिक्षिका असल्याने माझ्यामध्ये परिपूर्णतेच्या सवयी रुजवण्यात नेहमीच मदत केली.
IIM संबळपुरच्या प्लेसमेंटबद्दल बोलताना MBA (2021-2023) बॅचने भारतात वार्षिक ६४.६१ लाख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ६४.१५ लाख वार्षिक पॅकेजसह १००% प्लेसमेंट गाठले आहे. यंदाच्या बॅचच्या पहिल्या १० विद्यार्थ्यांचे सरासरी वेतन वार्षिक ३१.६९ लाख रुपये आहे. यांना १० विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, वेदांत, तोलाराम, अमूल, अडाणी ईवाय, एक्सेंचर, कॉग्निझंट, डेलॉइट आणिअॅमेझॉन इत्यादींचा समावेश आहे. या सर्वांमुळे संस्थेचा प्लेसमेंट रेकॉर्ड १०० टक्के झाला आहे.