आयआयटी मद्रास येथील संशोधकांनी एक अशी प्रणाली विकसित आणि तैनात केली आहे जी समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करू शकते. सिंधुजा १ नावाचे हे तंत्रज्ञान तामिळनाडूमधील तुतीकोरीनच्या किनाऱ्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर संशोधकांनी तैनात केले आह. या ठिकाणी समुद्राची खोली सुमारे २० मीटर आहे.

सिंधुजा १ सध्या १०० वॉट ऊर्जा निर्माण करू शकते. येत्या तीन वर्षात एक मेगावॉट ऊर्जा निर्मितीसाठी तिचा विस्तार केला जाईल. हे तंत्रज्ञान बेटांसाठी उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Fire on the third floor of Bhimashankar Society in Hadapsar
हडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
Contractor charging Rs 2 each from commuters for free toilet at Thane railway station
ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात लुबाडणूक

(Vivo Y02 भारतात लाँच, 1TB पर्यंत वाढवू शकता इंटरनल स्टोअरेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

या तंत्रज्ञानाद्वारे शहराला किंवा त्याचा छोट्या भागाला वीज पुरवठा करणे महागडे ठरू शकते. त्याऐवजी पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरणे स्वस्त असेल. मात्र, बेट आणि ऑफशोअर स्थळी उर्जा पोहोचवण्याचा खर्च हा लाटांद्वारे वीज निर्मितीपेक्षा अधिक असू शकतो, असे संशोधनाचे नेतृत्व करणारे अब्दुस समद यांचे मत आहे. समद हे आयआयटी मद्रासच्या महासागर अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक आहेत.

सिंधुजा १ प्रणालीमध्ये तरंगणारी बुई, एक स्पार आणि इलेक्ट्रिकल मॉड्युलचा समावेश आहे. लाटा वर खाली होत असातना बुई वर खाली सरकते. बुईच्या मध्यभागी छिद्र असून ते स्पारला त्यातून जाऊ देईल. लाटांमुळे हलू नये यासाठी स्पार समुद्राच्या तळाशी बसवण्यात आले आहे. मात्र जेव्हा बुई हलते आणि स्पार हलत नाही तेव्हा लाटा दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन तयार करतात. या रिलेटिव्ह मोशनचा वीज निर्मितीसाठी जनरेटरकडून वापर होतो. परंतु, ऑफशोअर स्थानावर अशी जटिल प्रणाली तयार करणे आव्हानास्पद ठरते. उदाहरणार्थ, पवन ऊर्जेपासून निर्माण होणार्‍या ऊर्जेच्या प्रमाणात दिवसभरात आणि वर्षभरात हवामान बदलासह चढ उतार होत असते.

(आधीच कोविड, त्यात चीनला बसू शकतो मोठा फटका; APPLE ‘या’ देशांमध्ये उत्पादन हलवणार असल्याची चर्चा)

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये लहरींची उंची बदलते. हवामान शांत असताना प्रणाली ऊर्जा निर्माण करत नसेल तर ठीक आहे. परंतु, प्रणाली खडबडीत हवामान सहन करू शकते याची खात्री करणे गरजेचे आहे. कारण खराब हवामानात जर ही प्रणाली वाहून जात असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करण्यात काही अर्थ नाही, असे समद यांनी सांगितले.

प्रणाली व्यवस्थीत काम करते की नाही हे तपासण्यासाठी संशोधकांनी नोव्हेंबर महिना निवडला जेव्हा आयएमडीने तामिळनाडू राज्यातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. या काळात प्रणालीने चांगल्याप्रकारे काम केल्याचे, समद यांनी सांगितले.

(२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी)

बाल्यावस्थेत असल्यामुळे सध्या या प्रणालीद्वारे निर्मित उर्जेचा वापर करणारी कोणतीही उपकरणे नाहीत. डिसेंबर २०२३ पर्यंत रिमोट वॉटर डिसॅलिनेशन सिस्टीम आणि पाळत ठेवणारा कॅमेरा तैनात करण्याची संशोधन टीमची योजना आहे. हवामानातील बदलांमुळे वीजनिर्मितीतील चढ उतारांना कसे सामोरे जावे हे समजून घेण्यासाठी पुढील चाचण्या घेण्याचीही योजना आहे.